Ad will apear here
Next
‘स्वरसम्राज्ञी’च्या नव्वदीनिमित्त राज्यभरात एकाच वेळी ९० मैफली
मुंबई, पुणे, नागपूरसह ब्रिटनमध्येही होणार ‘स्वरस्वती’ कार्यक्रमाचे सादरीकरण
पुणे : स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना २८ सप्टेंबर २०१९ रोजी ९० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने त्या दिवशी सायंकाळी साडेपाच वाजता मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यभरातील ९० ठिकाणी ‘स्वरस्वती’ या नावाने एकाच वेळी मैफली सादर होणार आहेत. तसेच ब्रिटनमध्येही एक कार्यक्रम होणार आहे. या सर्व मैफलींमध्ये लतादीदींची गाणी सादर केली जाणार आहेत. ‘हार्मनी इव्हेंट्स’ या नागपूरच्या संस्थेने या कार्यक्रमाची निर्मिती केली असून, ही आगळीवेगळी संकल्पना राजेश समर्थ यांची आहे. 

यातील एक विशेष कार्यक्रम पुण्यातील नव्या पेठेतील निवारा वृद्धाश्रमासमोरच्या प्रभू ज्ञान मंदिरात सादर होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन गायिका रेवती सुपेकर यांनी केले आहे. 

या आधी एकाच वेळी ७३ कार्यक्रम आयोजित करण्याचा विक्रम ब्रिटनमधील एका संस्थेने केला होता. तो मोडला जाण्यासाठी ‘स्वरस्वती’ कार्यक्रमाद्वारे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी हार्मनी इव्हेंट्स ही आयोजक संस्था विशेष प्रयत्न करत असल्याची माहिती रेवती सुपेकर यांनी दिली. त्यासाठी ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’ला प्रवेशिका पाठविण्यात आली आहे.

या सर्व कार्यक्रमांत एकत्रितरीत्या सुमारे ५५० गायिका, ३०० गायक, ९० निवेदक आणि वादकांसह अन्य सुमारे ६०० जण सहभागी होणार आहेत. 

पुण्यातील मैफलीमध्ये रेवती सुपेकर, केतकी देशपांडे, रेश्मा कापशीकर, करिश्मा गडकरी, नेहा वैशंपायन, अभिजित नांदगावकर हे गायक कलाकार गीते सादर करणार आहेत. संतोष कुलकर्णी, अभिजित भदे, किरण एकबोटे, नंदू फौजदार  हे वादक कलाकार या कार्यक्रमात सहभागी होणार असून, डॉ. मानसी अरकडी निवेदन करणार आहेत. हा कार्यक्रम समस्त रसिकांसाठी विनामूल्य खुला असणार आहे. कोल्हापूर, ठाणे, मुंबई, नागपूर, मुलुंड या ठिकाणीही मैफली होणार आहेत.

लतादीदींनी गायलेली एकाहून एक सरस गीते, युगलगीते या मैफलींत सादर होणार आहेत. लतादीदींवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी, त्यांना वाढदिवसाच्या संगीतमय शुभेच्छा देण्यासाठी ‘स्वरस्वती’ कार्यक्रमाचे कलाकार सज्ज झाले आहेत. रसिकांनी पुण्यात व राज्यभरात इतर ठिकाणी सादर होणार असलेल्या या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद देण्याचे आवाहन रेवती सुपेकर आणि हार्मनी इव्हेंट्सतर्फे करण्यात आले आहे.

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi