Ad will apear here
Next
‘टाइम्स अँड ट्रेंडस्‌ अकादमी’ला ‘बेस्ट स्किल लर्निंग प्लेसमेंटस्‌’ पुरस्कार
पुरस्कार स्वीकारताना टाइम्स अँड ट्रेंडस्‌ अकादमीचे संस्थापक अमित अग्रवाल आणि संचालक रश्मी अग्रवाल

पुणे : विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्रासंदर्भात उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी पुण्यातील ‘टाइम्स अँड ट्रेंडस्‌ अकादमी’ला (टीटीए) नवव्या भारतीय शैक्षणिक पुरस्कार सोहळ्यामध्ये, ‘बेस्ट स्किल लर्निंग इन्स्टिट्यूट-इंडस्ट्री प्लेसमेंटस्‌’ या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

विद्यार्थ्यांना आर्थिक स्वातंत्र्य, उत्तम करिअर आणि मानसिक समाधान प्राप्त व्हावे म्हणून व्यावसायिक प्रशिक्षणाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या टाइम्स अँड ट्रेंडस्‌ अकादमीने देशभरातील पाचशेहून अधिक स्पर्धकांमधून आघाडी घेत, हा पुरस्कार स्वीकारला. तेलंगणाचे महाविद्यालयीन शिक्षण विभागाचे आयुक्त नवीन मित्तल आणि लॉजिस्कूलचे सह-संस्थापक ग्युला च्सीतारी यांच्या हस्ते टाइम्स अँड ट्रेंडस्‌ अकादमीचे संस्थापक अध्यक्ष अमित अग्रवाल आणि टीटीएच्या संचालक रश्मी अग्रवाल यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
 
या वेळी अमित अग्रवाल म्हणाले, ‘देशातील सर्वोच्च व्यावसायिक प्रशिक्षण अकादमी बनण्यासाठी  टाइम्स अँड ट्रेंडस्‌ अकादमी (टीटीए) सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. उद्योगाच्या अपेक्षा आणि शिक्षण प्रणाली यांच्यामध्ये असणारी प्रचंड दरी कमी करण्यासाठी टाइम्स अँड ट्रेंडस्‌ अकादमी कार्यरत आहे. सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी, त्यांच्या अपेक्षेप्रमाणे प्रसिद्धी आणि पैसा मिळवण्यासाठी आवश्यक ती सर्व कौशल्ये मिळावीत यासाठी संस्था काम करत आहे. बाजारपेठेची,उद्योगांची  काय अपेक्षा आहे हे समजून घेणे हे आमचे मुख्य लक्ष्य आहे आणि टीटीएचे विद्यार्थी ती पूर्ण करतील याची आम्ही निश्चिती करतो.’  

टीटीएन्सना उद्योगामध्ये आपले कौशल्ये सिद्ध करण्याची संधी दिल्याबद्दल आणि या संस्थेवर विश्वास दाखविल्याबद्दल रश्मी अग्रवाल यांनी उद्योगातील प्रमुखांचे आभार मानले.  
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language