Ad will apear here
Next
निवडणूक आयोगाकडून पुणे विभागातील तयारीचा आढावा
पुणे विभागातील निवडणूक तयारीच्या आढावा बैठकीत सहभागी झालेले वरिष्ठ निवडणूक उपायुक्त उमेश सिन्हा, उपायुक्त चंद्रभूषण कुमार, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आदी

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाचे वरिष्ठ निवडणूक उपायुक्त उमेश सिन्हा यांनी पुणे विभागातील जिल्हाधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांकडून पूर्वतयारी आणि कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला.

यशदा येथे पुणे विभागातील पुण्यासह सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात आला. या वेळी निवडणूक उपायुक्त चंद्रभूषण कुमार, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पुणे शहर पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई उपस्थित होते.

‘मतदारांना मतदान करणे सोयीचे व्हावे यासाठी मतदान केंद्रावर खात्रीशीर किमान सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. दिव्यांग मतदार, ज्येष्ठ नागरिक, महिला यांचीही विशेष काळजी घेतली जावी. मतदारांना आपले मतदान केंद्र कुठे आहे, मतदार यादीतील क्रमांक याची माहिती वेळेपूर्वी मिळेल याची दक्षता घेतली जावी, मतदारांना मतदार चिठ्ठया वेळेपूर्वी उपलब्ध करून दिल्या जाव्यात. निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजावेत,’ असे सिन्हा यांनी सांगितले.  


‘निवडणूक कामावर असणाऱ्या सर्वांना मतदान करता यावे, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जावी. आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याबरोबरच भरारी पथके, देखरेख पथके यांचा सक्षमपणे वापर करण्यात यावा. मतदानाचे प्रमाण वाढावे, यासाठी व्यापक जनजागृती करावी,’ असेही त्यांनी सांगितले. 

या वेळी पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, सातारच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई, सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi