Ad will apear here
Next
डॉ. गो. बं. देगलूरकर यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर
डॉ. गो. बं. देगलूरकरपुणे : ‘पुण्यभूषण फाउंडेशन (त्रिदल) आणि पुणेकरांच्या वतीने दिला जाणारा पुण्यभूषण पुरस्कार’ या वर्षी ज्येष्ठ पुरातत्वतज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांना जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार पुरातत्वशास्त्र क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी देण्यात येत आहे,’ अशी माहिती  फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी पत्रकाद्वारे दिली.

पुरस्काराचे यंदाचे ३१ वे वर्ष आहे. एक लाख रुपये रोख आणि सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरित असलेली बालशिवाजींची प्रतिमा, पुण्याच्या ग्राम देवतांसह असलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण स्मृतिचिन्हाने या वर्षीच्या पुण्यभूषण पुरस्कारार्थींना गौरविण्यात येणार आहे. या पुरस्काराबरोबर सीमेवर लढताना जखमी झालेल्या पाच सैनिकांना आणि एका वीरमातेलाही गौरविण्यात येणार आहे. यात वीरमाता लता नायर, रायफल मॅन थानसिंग, ग्रेनेड मॅन बलबीर सिंग, नाईक फुलसिंग, हवालदार प्रमोद सपकाळ, हवालदार गोविंद बिरादार यांचा समावेश आहे.

पुण्यभूषण पुरस्कारार्थींचे नाव पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने निश्चित केले. हा पुरस्कार लवकरच प्रदान करण्यात येणार असून, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या स्मृतिदिनी दर वर्षी या पुरस्काराची घोषणा केली जाते. या तीन हुतात्म्यांची प्रेरणा समोर ठेऊन ‘त्रिदल पुणे’ संस्थेची स्थापना झाली. या संस्थेने हा पुरस्कार सुरू केला.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language