Ad will apear here
Next
एस. एम. जोशी महाविद्यालयात कारगिल विजय दिन साजरा
कारगिल विजय दिनानिमित्त एस. एम. जोशी महाविद्यालयात शहीद जवानांना आदरांजली अर्पण करताना प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले, एन. सी. सी. छात्र व विद्यार्थी.

पुणे : हडपसर येथील एस. एम. जोशी महाविद्यालयात कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला. या वेळी कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले, प्राध्यापकवर्ग, एन. सी. सी. छात्र व  विद्यार्थी यांनी आदरांजली वाहिली. या वेळी झालेल्या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले यांनी मार्गदर्शन केले. 

‘देशात शांतता व सुव्यवस्था राहण्यासाठी देशाच्या सीमेवर सैनिक अहोरात्र झटत असतात. त्यांचा सर्व भारतवासीयांना अभिमान वाटतो. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आजच्या तरुणांनी समाजातील अनिष्ट प्रथा, परंपरांना बाजूला सारत सामाजिक बांधिलकी मानून कार्यरत राहिले पाहिजे,’ असे मत त्यांनी व्यक्त केले. 
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language