Ad will apear here
Next
डियर जिंदगी
जेव्हा आयुष्यात संकटे येतात, त्या वेळी न डगमगता त्यावर मात करणारी माणसे जगात असतात आणि सतत रडणारी माणसेही आजूबाजूला असतात. त्यांच्या स्वभावांचा अभ्यास करून डॉ. मनीषा भोजकर यांनी ‘डियर जिंदगी’ हे पुस्तक लिहिले असून, त्यातून सकारात्मक विचार लोकांपर्यंत पोहोचविले आहेत. ‘दिवस तुझे हे फुलायचे’ असा टीनएज म्हणजेच १३ ते १९ वर्षे वयोगटाचा काळ स्वच्छंदी, स्वप्नाळू असतो; पण त्याचबरोबर जबाबदारीचाही असतो, याची जाणीव करून देऊन या वयात प्रेमात पडणे, मुलींमध्ये सुंदर दिसण्याचे वेड, आयुष्याचे स्वप्न, ध्येयनिश्चिती याविषयी लेखिकेने मार्गदर्शन केले आहे. आयुष्यातील संघर्ष, प्रत्येक गोष्टीची दुसरी बाजू, दृष्टिकोन, प्रत्येकातील ‘जीनिअस’पणा, तारुण्यातील सेटल होण्याचा काळ, याविषयीचे विचार यात व्यक्त केले आहेत. आई-बाबांसाठी यात एक प्रकरण आहे. भावनिक बुद्धिमत्ता, नात्यांचा वेध, जीवनाचा वेग, ताणतणावाचे व्यवस्थापन आदी अनेक विषय यात आले आहेत. शरीर, मन, बुद्धी या स्तरांवर सकारात्मक दृष्टिकोन कसा जोपासावा, आहार-विहार-विचार यांची त्रिसूत्री कशी सांभाळावी, भाव-भावनांचे संतुलन कसे राखावे, हेही सांगितले आहे.

पुस्तक : डियर जिंदगी
लेखिका : डॉ. मनीषा भोजकर
प्रकाशिका : डॉ. मनीषा भोजकर
पृष्ठे : १४०
मूल्य : २०० रुपये

(‘डियर जिंदगी’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language