Ad will apear here
Next
‘‘१०८’ रुग्णवाहिका महाराष्ट्राची जीवनदायिनी’
एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
सार्वजनिक आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पूरग्रस्तांना मदत करणारे ‘१०८’चे डॉक्टर व पायलट यांचा सत्कार करण्यात आला.

पुणे : ‘अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये जखमी झालेल्या रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत करण्यासाठी सुरू झालेली ‘१०८’ ही सेवा महाराष्ट्राची जीवनदायिनी आहे,’ असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. शिंदे यांच्या हस्ते पूरग्रस्तांना मदत करणारे ‘१०८’चे डॉक्टर व पायलट यांचा सत्कार सांगवी येथील मुख्यालयात करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी ‘बीव्हीजी’चे उपाध्यक्ष डॉ. दत्ता गायकवाड, महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके उपस्थित होते. 

महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या वतीने सांगली जिल्ह्यात २४, कोल्हापूर जिल्ह्यात ३६, तर सातारा जिल्ह्यात ३२ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. कोल्हापूर, सांगली व साताऱ्याला पुराचा वेढा बसल्याने १० अतिरिक्त रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या होत्या. पूरस्थिती असताना पाच हजार ८१९ रुग्णांना आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरवण्यात आली होती. यात एका गोंडस बाळाचा जन्मसुद्धा झाला होता.


शिंदे पुढे म्हणाले, ‘‘१०८’ या रुग्णवाहिकांमुळे हजारो नागरिकांना मदत झाली आहे. अपघाताच्या ठिकाणावरून कोणीही ‘१०८’ या क्रमांकावर फोन केल्यावर तातडीने वैद्यकीय मदत दिली जाते. ही सेवा नागरिकांसाठी मोफत आहे. आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय उपचारासाठी सुरु करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेत राज्यात सुमारे ३३ हजार बाळंतपणे सुखरुप पार पडली आहेत. सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे या पूरग्रस्त भागातील हजारो नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात या रुग्णवाहिकेने महत्त्वाची कामगिरी बजावली. अपघातानंतर लगेचच आवश्यक ते प्राथमिक उपचार मिळाल्याने लाखोंचे प्राण वाचले आहेत. आतापर्यंत विविध १३ प्रकारच्या वैद्यकीय आपत्कालीन स्थितीतील रुग्णांना वेळेत उपचार मिळाले आहेत. रस्ता अपघात, नैसर्गिक आपत्ती, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला गोल्डन अवरमध्ये उपचार मिळण्याकरिता अत्याधुनिक रुग्णवाहिकेची ही सेवा सुरू करण्यात आलेली आहे. त्यासाठी ‘१०८’ हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला असून, राज्यातील लाखो नागरिकांसाठी हा क्रमांक जीवनदायी ठरला आहे. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत आलेल्या लाखो कॉल्सच्या माध्यमातून रुग्णांना तातडीची वैद्यकीय उपचाराची सुविधा या रुग्णवाहिकेने दिली आहे.’

डॉ. शेळके म्हणाले,  ‘मागील पाच वर्षांत राज्यात सुमारे ३३ हजार ३२८ गर्भवतींचे सुखरुप बाळंतपण करण्यात यश मिळाले आहे. या सेवेंतर्गत ९३७ रुग्णवाहिका राज्यात चालविल्या जात आहेत. तसेच दोन वर्षांपूर्वी राज्यात मुंबईमध्ये बाईक ॲम्ब्युलन्स सुरू करण्यात आली. त्या माध्यमातून आतापर्यंत २२ हजार रुग्णांना सेवा देण्यात आली आहे. या सेवेचा विस्तार करीत मुंबईमध्ये १८, पालघर, अमरावती येथे प्रत्येकी पाच, तर सोलापूर आणि गडचिरोली येथे प्रत्येकी एक अशा एकूण ३० बाईक ॲम्ब्युलन्स सध्या कार्यरत आहेत.’
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language