Ad will apear here
Next
मातोश्री शिक्षण संस्थेत स्वातंत्र्यदिन साजरा
नाशिक : येथील मातोश्री शिक्षण संस्थेत देशाचा एकत्तरावा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संस्थेचे संस्थापक नरेंद्र दराडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गजानन खराटे, उपप्राचार्या डॉ. वर्षा पाटील, व्यवस्थापन महाविद्यालयाचे संचालक डॉ. योगेश गोसावी, पॉलिटेक्निकचे प्राचार्य संजय बागुल, औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन जैन, मातोश्री शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली सूर्यवंशी, मातोश्री इंग्लिश मेडीयम स्कूलच्या प्राचार्या किर्ती निकम आदी मान्यवर उपस्थित होते.

‘देशाच्या प्रगतीत युवकांचे योगदान खूप महत्वाचे असून देशहिताचा विचार करून नागरिकांनी विशेषता युवकांनी भारतीय बनावटीच्या वस्तूंचा वापर करण्यास प्राधान्य द्यावे,’ असे आवाहन डॉ. गजानन खराटे यांनी या वेळी केले. संस्थेचे संस्थापक नरेंद्र दराडे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत युवकांच्या यशस्वीतेवर भाष्य केले.

याप्रसंगी विभागप्रमुख प्रा. उदय नाईक, प्रा. जयंत भंगाळे, प्रा. निरंजन भाले, प्रा. देविदास दिघे, प्रा. श्रीधर खुळे, प्रा. अण्णासाहेब तांबे, प्रा. शैलेन्द्र शुक्ला, रोजगार व प्रशिक्षण अधिकारी प्रा. निलेश घुगे आदी मान्यवर उपस्थित होते.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language