Ad will apear here
Next
सचिन मधुकर परांजपे लिखित ‘चैतन्यस्पर्श’ पुस्तक लवकरच भेटीला; प्रकाशनपूर्व सवलत जाहीर
सचिन मधुकर परांजपेपुणे : ज्योतिष, वास्तुशास्त्र आदी विषयांचे मार्गदर्शक आणि अध्यात्मविषयक लेखन करणारे पालघर येथील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व म्हणजे सचिन मधुकर परांजपे. त्यांनी लिहिलेले ‘चैतन्यस्पर्श’ हे नवे पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीला येत आहे. पुण्याच्या बुकगंगा पब्लिकेशन्सतर्फे हे पुस्तक प्रकाशित केले जात असून, प्रकाशनपूर्व नोंदणी केल्यास सवलत मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. 

‘माझ्या आध्यात्मिक साधनेच्या प्रवासात मला भेटलेले अवलिये, गुरू, योगी यांच्याकडून मला बरेच काही शिकायला मिळाले, आत्मसात करता आले आणि साधनेला दिशा देता आली. माझ्या संपर्कात आजही असे कित्येक अवलिये, फकीर आणि साधक आहेत. प्रत्येक जण निरनिराळा आहे. प्रत्येकाची साधना, वर्ग निरनिराळा आहे; पण तरीही त्यात एक समान धागा आहे तो म्हणजे अध्यात्माचा, ईश्वरनिष्ठेचा, समर्पणाचा. प्रत्येकाने मला खूप काही शिकवले. श्रीमद्भगवद्गीतेतील सांख्ययोगापासून ईशावास्योपनिषदापर्यंत अनेकांशी अनेक चर्चा झाल्या. मला जे अनुभव ध्यानातून, प्रत्यक्ष भेटीतून आले ते वाचनीय स्वरूपात ‘चैतन्यस्पर्श’ या पुस्तकातून मी वाचकांसमोर मांडले आहेत,’ असे सचिन मधुकर परांजपे यांनी सांगितले.

या पुस्तकाची किंमत २९९ रुपये असून, एक ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०१९ या कालावधीत पूर्वनोंदणी केल्यास हे पुस्तक २४९ रुपयांत मिळणार आहे, असे बुकगंगा पब्लिकेशन्सने कळवले आहे. नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा. 

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi