Ad will apear here
Next
‘पुरस्कारामुळे समाजकार्याला प्रोत्साहन मिळते’
प्रवीण तरडे यांचे मत
पुरस्कार विजेत्यांसह प्रवीण तरडे, डॉ. विकास आबनावे, अशोक आबनावे आदी मान्यवर

पुणे : ‘समाजासाठी आपले काहीतरी योगदान असावे, असे प्रत्येकाला वाटत असते. त्याच प्रेरणेतून समाजकार्य होत राहते. केलेल्या कार्याचा उचित सन्मान झाला, तर आणखी जोमाने काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळते,’ असे मत प्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेते प्रवीण तरडे यांनी व्यक्त केले.

युवा फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘स्वामी विवेकानंद युवा गौरव’, ‘डॉ. अब्दुल कलाम’, ‘डॉ. द्वारकादास कोटणीस’ व ‘राजीव गांधी समाजभूषण’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रंगदर्शन सभागृहात झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी सामाजिक कार्यकर्ते अशोक इनामदार, महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव डॉ. विकास अबनावे, संयोजक नितीन भोसले, अॅड. वैशाली भोसले आदी उपस्थित होते.


प्रवीण तरडे म्हणाले, ‘ज्या क्षेत्रात आपण कार्य करतो, ते उल्लेखनीय कसे होईल, याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. समाजाप्रती आपली बांधिलकी जपत ज्यांनी समाजसेवेसाठी आपले आयुष्य वाहिले, अशा व्यक्तींचा आदर्श ठेवून इतरांची दुःखे दूर करण्यासाठी योगदान देण्याचा प्रयत्न आपण करावा.’

डॉ. विकास आबनावे म्हणाले, ‘तरुणाईकडे शिक्षणाचे अस्त्र आहे. त्याचा उपयोग समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी करावा. आपण इतरांना मदत केली, तर आपल्यालाही कोणीतरी मदत करेल, हा विचार केला पाहिजे. त्यातूनच समाजाची, देशाची प्रगती होईल.’

अशोक इनामदार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. अॅड. वैशाली भोसले यांनी प्रास्ताविक केले. भैरवनाथ कानडे यांनी सूत्रसंचालन केले. नितीन भोसले यांनी आभार मानले.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi