Ad will apear here
Next
सुरांनी भारावलेल्या वातावरणात ‘भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सवा’ची सांगता
पहिला ‘पं. भीमसेन जोशी कलागंधर्व पुरस्कार’ डॉ. अविराज तायडे यांना प्रदान
डॉ. अविराज तायडे यांना पं. भीमसेन जोशी यांच्या कन्या शुभदा मुळगुंद यांच्या हस्ते पहिला ‘पं. भीमसेन जोशी कलागंधर्व पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. या वेळी (डावीकडून) सच्चिदानंद कुलकर्णी, शीला देशपांडे, शुभदा मुळगुंद, पं. पांडुरंग मुखडे

पुणे : भारावून टाकणारी गायकी, मधाळ आवाज आणि मंत्रमुग्ध करणारे सतारीचे स्वर अशा अनोख्या त्रिवेणी संगमात ‘भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सवा’चा अखेरचा दिवस रंगला होता. विविध राग आणि त्याला रसिकांकडून मिळणारी उत्स्फूर्त दाद यामुळे ही सुरेल सांज उत्तरोत्तर रंगतच गेली.

डॉ. अविराज तायडेभारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कलाश्री संगीत मंडळातर्फे ‘भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. औंधमधील पं. भीमसेन जोशी कलामंदिर येथे महोत्सव झाला. याबरोबरच कलाश्री संगीत मंडळातर्फे या वर्षीपासून संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना पं. भीमसेन जोशी कलागंधर्व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य व किराणा घराण्याचे गायक डॉ. अविराज तायडे यांना हा पहिला पुरस्कार पं. भीमसेन जोशी यांच्या कन्या शुभदा मुळगुंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रोख रुपये ११ हजार, मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

या वेळी पुण्याचे माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, उस्ताद रईस बले खान, कलाश्री संगीत मंडळाचे संस्थापक सुधाकर चव्हाण, ‘टॉक्ड’ कंपनीच्या सहसंस्थापिका प्रणाली विचारे, डॉ. रेखा खेडेकर, रजनीकांत खेडेकर, पं. श्रीकांत देशपांडे यांच्या पत्नी शीला देशपांडे, अॅड. सुलभा गुळवे, ह.भ.प. चारुदत्त आफळे, वैभव कनगलेकर आदी उपस्थित होते.

मोहसीन खानकिराणा घराण्याचे गायक डॉ. अविराज तायडे यांनी राग मुलतानीने गायनास सुरुवात केली. ‘गोकुल गाव...’ या बंदीशिद्वारा विलंबित एकतालातील बडा ख्याल गात रागाचा विस्तार केला. त्यांनतर ‘मानत नाही जियारा..’ म्हणत तीनतालातील छोटा ख्याल सादर केला. तर ‘राम रंगी रंगले...’ या भजनाने त्यांनी आपल्या मैफलीचा समारोप केला. त्यांना प्रशांत पांडव (तबला), प्रभाकर पांडव (हार्मोनियम), आशिष रानडे, आरोह ओक (स्वरसाथ) यांनी साथसंगत केली.

त्यांनतर धारवाड घराण्याचे सतार वादक मोहसीन खान यांच्या वादनाने रसिकांना एका वेगळ्याच सुरेल दुनियेची सैर घडली. राग काफीमधील आलाप, जोड झाला, तीनतालातील गत ऐकताना रसिक मंत्रमुग्ध झाले. त्यांना रोहित मुजुमदार यांनी तबल्यावर साथसंगत केली.

पं. सुधाकर चव्हाणमहोत्सवाचा समारोप पं. श्रीकांत देशपांडे व डॉ. सुधाकर मराठे यांचे शिष्य पं. सुधाकर चव्हाण यांच्या गायनाने झाला. राग मालकंसने त्यांनी गायनाला सुरुवात केली. विलंबित एकतालातील बडा ख्याल ‘पग लाग न दे...’ ही बंदिश पेश केली. त्यांनतर ‘मुख मोर मोर...’ द्वारे छोटा ख्याल सादर केला. सुरांनी मंतरलेल्या या महोत्सवाचा समारोप ‘आग वैकुंठीच्या राया...’ या भैरवीने झाला. या वेळी पं. पांडुरंग मुखडे (तबला), पं. प्रभाकर पांडव (हार्मोनियम), गंभीर महाराज अवचर (पखावज), शिवानंद स्वामी, संदीप गुरव, अनिता सुळे (स्वरसाथ) यांनी साथसंगत केली. 
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language