Ad will apear here
Next
पुण्याच्या चैताली पाटील ठरल्या ‘मिसेस इंडिया-एम्प्रेस ऑफ द नेशन’
चैताली पाटील

पुणे : ‘दिवा पेजंट्स’च्या अंजना व कार्ल मस्कारेन्हास यांनी आयोजित केलेल्या सौंदर्य स्पर्धेत पुण्याच्या चैताली पाटील यांनी ‘मिसेस इंडिया-एम्प्रेस ऑफ द नेशन २०१९’ हा पुरस्कार, तसेच टॉप मॉडेलचा सन्मानही मिळवला आहे. स्थापत्य अभियंता असलेल्या चैताली पाटील थिसेनक्रुप इंडस्ट्रीज इंडिया कंपनीत कार्यरत आहेत.  

ही सौंदर्य स्पर्धा पुण्यातील हयात हॉटेलमध्ये नुकतीच पार पडली. अंतिम फेरीसाठी देशभरातून ४२ महिला स्पर्धकांची निवड झाली होती. त्यामध्ये चैताली पाटील यांनी सिल्व्हर श्रेणीमध्ये हा सन्मान पटकावला.  

हा किताब जिंकल्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना चैताली पाटील म्हणाल्या, ‘सौंदर्य स्पर्धेत सहभागी होऊन मुकूट पटकावण्याचे माझे बालपणापासूनचे स्वप्न होते. महाविद्यालयीन काळातही मी तीन सौंदर्य स्पर्धा जिंकल्या होत्या. आज हा प्रतिष्ठेचा किताब जिंकल्यानंतर माझे स्वप्न साकार झाले आहे. या यशात माझे पती  डॉ. संकेत पाटील, कुटुंबीय, सहकारी आणि मार्गदर्शक कार्ल व अंजना मस्कारेन्हास यांचे मोलाचे योगदान आहे.’

अभिनेता अश्मित पटेल, अभिनेत्री मुग्धा गोडसे व डॉ. अदिती गोवित्रीकर, ‘द बॉडी क्लिनिक’च्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. रचना शर्मा, ‘मिसेस इंडिया २०१८’च्या विजेत्या डॉ. गौरांगी श्रावत,  नृत्यांगना सिमरन गोधवानी, आंतरराष्ट्रीय मॉडेल पिया पावानी, हयात पुणेचे कमल शर्मा, कार्ल मस्कारेन्हास यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language