Ad will apear here
Next
‘डीकेटीई’तील ३१ विद्यार्थ्यांचे इंटरनॅशनल प्लेसमेंट
‘नॉइज जीन्स’ या आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड झालेले डीकेटीईचे ३१ विद्यार्थी.

इचलकरंजी : येथील ‘डीकेटीई’च्या टेक्स्टाइल व इंजिनीअरिंग पदवी शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचे ढाका (बांगलादेश) येथील ‘नॉइज जीन्स’ या आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये वार्षिक साडेआठ लाख वेतनावर प्लेसमेंट झाले आहे. 

‘नॉइज जीन्स’ ही अत्याधुनिक मशिनरींनी युक्त कंपनी डेनिम फॅब्रिक्स, जीन्स, जॅकेटस, शर्ट्स उत्पादित करते.  विव्हिंग, गारमेंटिंग, डाइंगच्या अत्याधुनिक मशिनरीवर क्वालिटी प्रॉडक्टस बनविणारी ही जगातील नामांकित कंपनी आहे. अशा या आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत कंपनीमध्ये ‘डीकेटीई’तील टेक्स्टाइलच्या २८ व इंजिनीअरिंगच्या तीन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. ‘नॉइज जीन्स’ कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ‘डीकेटीई’ला भेट दिली. सुरुवातीस अॅप्टिट्युड टेस्टद्वारे विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता तपासण्यात आली. त्यानंतर प्रीसिलेक्शन व फायनल सिलेक्शनच्या दोन फेऱ्यांमधून विद्यार्थ्यांची निवड केली.    

महादेव मोतीराम गाडे, अनुप दिलीप ढोकळे, संकल्प मनोज कोल्हे, निखिल प्रकाश खाडे, राजेश शाम साहू, नामदेव अर्जुन पोकळे, प्रतीक कुमार, सलिला दिलीपराव थिटे, सायली राजेंद्र चव्हाण, रोहन विवेकानंद जाधव, रश्मी कोटेश्‍वर कोडूर, आकाश धोंडीराम तेलवेकर, सौरभ नंदकिशोर परमाज, कार्तिकेयन एस., प्रदीप राजेंद्र दळवी, सुदर्शन मच्छिंद्र चोपडे, योगेश विश्‍वनाथ पाटोळे, निकिता राजेंद्र झारकर, संग्राम बाबासाहेब पाटील, संपदा मिलिंद सालकर, लक्ष्मेश्‍वर मोहम्मदगौस ए., सुशांत भरत सुपांदे, विघ्नेश गंगाधर पाटील, टी. धेवा वेंकटनागा साई चरण, रेणू दिलीप कांबळे, सुरदास छगन दिवटे, मधू मल्लेश दुसा, वैभवी सुनील वाली, विवेक द्विवेदी, सौरभ शैलेंद्र भोसले व साहिल सलीम मकानदार अशी निवड केलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. 

या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अ‍ॅंड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. एस. बी. अकिवाटे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल ‘डीकेटीई’चे संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, उपसंचालक प्रा. डॉ. यू. जे. पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. 
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language