Ad will apear here
Next
आनंद शिंदेंच्या ‘मोरया’ गाण्याच्या यशाप्रीत्यर्थ ‘भुतियापंती’ची टीम सिद्धिविनायकाचरणी


मुंबई :
नुकत्याच सरलेल्या गणेशोत्सवात आनंद शिंदे यांच्या आवाजातील आणि आगामी ‘भुतियापंती’ चित्रपटातील ‘मोरया’ गाण्याने रसिकांना मोहिनी घातली. या गाण्याला अल्पावधीत मिळालेल्या आणि मिळत असलेल्या चांगल्या यशामुळे ‘भुतियापंती’ चित्रपटाच्या टीमने मुंबईतील प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. त्यांच्या चित्रपटातील ‘मोरया’ गाण्याला मिळणाऱ्या भरघोस प्रतिसादाबद्दल या टीमने बाप्पाकडे कृतज्ञता व्यक्त केली. 



या गाण्यासारखेच यश ‘भुतियापंती’ सिनेमालाही मिळू दे, असे साकडे त्यांनी सिद्धिविनायकाला घातले. या वेळी निर्माते विनोद बरदाडे, नरेश चव्हाण व सहनिर्माते यशवंत डाळ आणि दिग्दर्शक संचित यादव उपस्थित होते. सिद्धिविनायक ट्रस्टचे माजी अध्यक्ष धनंजय बरदाडे आणि कलाकारांच्या वतीने कमलेश सावंत यांनी हजेरी लावली होती. इतर कलाकारांची नावे अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. ‘भुतियापंती’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

(याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi