Ad will apear here
Next
‘महिंद्रा इन्शुरन्स’चे यश
मुंबई : महिंद्रा इन्शुरन्स ब्रोकर्स लिमिटेडने (एमआयबीएल) सीएमएमआय इन्स्टिट्यूट पीपल कॅपबिलिटी मॅच्युरिटी मॉडेलचा पाचव्या स्तरावरील मॅच्युरिटी गाठली आहे, हा टप्पा गाठणारी ही जागतिक स्तरावरील पहिली इन्शुरन्स ब्रोकिंग कंपनी ठरली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील हा यशाचा टप्पा कंपनीने प्राप्त केला आहे. क्यूएआय इंडिया लिमिटेडच्या राजेश नाईक यांच्याद्वारे ही वाढ झाली होती.

पाचव्या स्तरावरील वाढती मॅच्युरिटी संस्थेची ‘सकारात्मकते’ची स्तरीय कामगिरी दर्शवतो. या स्तरावर, संस्था सातत्याने प्रक्रियांवर आधारित सामंजस्य सिद्ध करते. व्यवसायातील घटक आणि कामगिरीच्या गरजा यासाठीचे सामंजस्य दिसून येते. संस्थेतर्फे प्रमाणबद्ध दृष्टिकोनामुळे प्रक्रिया आणि प्रक्रियांच्या आउटकमची कारणे यांची विविधता पाहता येते.

‘पीपल-कॅपॅबिलिटी मॅच्युरिटी मॉडेल’ हे अमेरिकेच्या सीएमएम इन्स्टिट्यूटद्वारे सादर करण्यात आलेले संस्थेच्या परिवर्तनाचे मॉडेल आहे. सीएमएम इन्स्टिट्यूट जागतिक स्तरावरील लोक, प्रक्रिया आणि तंत्रज्ञान यांच्यातील सर्वोत्तम सेवा देणारी अत्याधुनिक कंपनी आहे. संस्थेतर्फे सामग्री पुरवली जाते आणि संस्थेसाठी सर्वोत्तम क्षमतांना आणि मॅच्युरिटी उभारणीसाठी पाठिंबा दिला जातो. सर्वोत्तम सेवा देणे आणि कामगिरींमधील त्रुटींसाठी या प्रक्रिया राबवल्या जातात.

२५ वर्षांपासून विविध उद्योगक्षेत्रे, एरोस्पेस, वित्त, आरोग्य सेवा, सॉफ्टवेअर, संरक्षण, वाहतूक आणि टेलिकम्युनिकेशन्स अशा हजारो सेवा देणाऱ्या उच्चतम सांस्थिक सेवा दिल्या जातात. यासाठी सीएमएमआय मॅच्युरिटी लेव्हलचे गुणांकन प्राप्त करण्यात आले आहे आणि सक्षम व्यावसायिक भागीदार आणि पुरवठादार म्हणून सिद्ध करण्यात आले आहे.

महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडट उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रमेश अय्यर म्हणाले की, ‘महिंद्रा इन्शुरन्स ब्रोकर्स लिमिटेडने ‘पी-सीएमएम’चा पाचवा स्तर प्राप्त केला आहे. यासाठी वाढत्या आणि नाविन्यपूर्ण तांत्रिक सुधारणांद्वारे प्रक्रियांच्या कामगिरीवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. चपळता आणि कर्मचाऱ्यांची सबळता यामुळे ‘एमआयबीएल’ला मदत होते. यामुळे उद्योगक्षेत्रातील आव्हानांमध्ये यापुढेही वाटचाल होण्यासाठी ही मदत कामी येणार आहे.’

‘एमआयबीएल’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. जयदीप देवरे म्हणाले की, ‘जगातील ‘बीएफएसआय’ क्षेत्रातील ‘पी-सीएमएम’चा पाचवा स्तर प्राप्त करणारी पहिली कंपनी ठरल्याचा आम्हाला अतिशय आनंद झाला आहे, हा आमचा सन्मानच आहे. आमच्या टीममधील सदस्यांना सातत्याने संपूर्ण भौगोलिक प्रदेशातील संधी त्यांच्या क्षमतांसह विकसित करण्यासाठी प्रोत्साहित करत असतो. यामुळे आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम असा अनुभव प्राप्त होतो. या उत्तम यशामुळे आमच्या यंत्रणांचा आणि प्रक्रियांचा कस लागलेला आहे. आमचे स्थान आमच्या लोकांच्या क्षमता आणि आमची ग्राहकांप्रती असलेली वचने यात आम्ही सर्वात वरचा टप्पा गाठलेला आहे. आमच्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेमुळे पुढील कार्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळालेले आहे. लोकांना सर्वोत्कृष्ट सेवा देणे आणि ग्राहकांसाठी आनंदनिर्मिती करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत.’

‘एमआयबीएलच्या पी-सीएमएमचा पाचवा स्तर प्राप्त करणारे मॉडेल हे आमच्या सध्याच्या योग्यतांचा विकास आम्ही लक्षणीय स्तरावर करत आहोत आणि जागतिक स्तरावरील अध्यापनाच्या आणि विकासाच्या संस्कृतीची निर्मिती होणार आहे. यामुळे ‘एमआयबीआयएल’च्या जागतिक स्तरावरील एचआरची स्वीकृती आणि संरेखन, तसेच व्यावसायिक प्रक्रियांचे दर्जा आणि व्यावसायिकतेच्या शाश्वततेची खात्री देणे यांचा पुरुच्चार झाला आहे,’ असे महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शिअल सर्व्हिसेस सेक्टरचे प्रमुख लोकाधिकारी विनय देशपांडे म्हणाले.

‘महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स’बद्दल
महिंद्रा फायनान्स, ही महिंद्रा या भारतातील नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांमधील अग्रेसर कंपनीचा भाग असलेली कंपनी आहे. ग्रामीण आणि निम-शहरी क्षेत्रावर लक्ष केंद्रीत केलेल्या कंपनीचे ५.१ दशलक्ष ग्राहक आहेत आणि तिची वार्षिक उलाढाल ८.०८ अब्ज यूएस डॉलर्स आहे. ही कंपनी वाहने आणि ट्रॅक्टरसाठी प्रामुख्याने वित्तीय सेवा देते; तसेच एसएमईसाठी मुदत ठेवी आणि कर्ज देते. देशभरात कंपनीची एक हजार १७८ कार्यालये आहेत.

महिंद्रा फायनान्स ही भारतातील एकमेव नॉन-बँकिंग फायनान्शिअल कंपनी आहे, जी उगवत्या मार्केट प्रकारामध्ये डो जोन्स सस्टेनबिलिटी इंडेक्टची निवड करते. महिंद्रा फायनान्सला ग्रेट प्लेस टू वर्क (जीपीटीडब्ल्यू) संस्थेतर्फे, ‘इंडियाज बेस्ट कंपनीज टू वर्क फॉर २०१७’ यासाठी द इकॉनॉमिक टाइम्ससह संलग्नितपणे सर्वोत्तम ५०मध्ये ४९वे स्थान प्राप्त झाले आहे.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language