Ad will apear here
Next
‘अष्टरंगी मैत्र’ कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
चतुरंग प्रतिष्ठानतर्फे फ्रेंडशिप डेच्या पूर्वसंध्येला रत्नागिरीत आयोजन


रत्नागिरी :
फ्रेंडशिप डे अर्थात मैत्रीदिनाचे मोठे आकर्षण तरुणांमध्ये असते. या पार्श्वभूमीवर, मैत्रीदिनाच्या पूर्वसंध्येला चतुरंग प्रतिष्ठानने गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ‘अष्टरंगी मैत्र’ हा विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी आठ क्षेत्रांतील मातब्बर मंडळींशी संवाद साधण्याची संधी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मिळाली आणि विविध विषयांशी त्यांचे मैत्र जुळले.



तीन ऑगस्ट रोजी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ मंडळींचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सहवास लाभावा व त्या विषयाची विद्यार्थ्यांना अधिक गोडी लागावी, हा या उपक्रमाचा महत्त्वाचा हेतू होता. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुळकर, संगणकतज्ज्ञ व लेखक अच्युत गोडबोले, सुप्रसिद्ध नृत्यांगना सोनिया परचुरे, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रसाद देवधर, अभिनेता-दिग्दर्शक आलोक राजवाडे, ज्येष्ठ पत्रकार-मुलाखतकार सुधीर गाडगीळ व कोकणातील सुप्रसिद्ध चित्रकार अरुण दाभोळकर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला गर्दी केली होती. 

सुहास बहुळकर

अरुण दाभोळकर

सुधीर गाडगीळ

डॉ. प्रसाद देवधर

डॉ. अच्युत गोडबोले

अशोक पत्की

सोनिया परचुरे

आलोक राजवाडे
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language