Ad will apear here
Next
‘नेक्स्ट एज्युकेशन’तर्फे शिक्षण व्यवस्थापन प्रणाली सादर
मुंबई : भारतामध्ये शिक्षणाचा दर्जा वाढवण्याच्या एकमात्र उद्देशाने नेक्स्ट एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेडतर्फे आपल्या नेक्स्ट लर्निंग मंचावर अलीकडेच शिक्षण व्यवस्थापन प्रणालीला सुरुवात केली आहे. शिक्षण व्यवस्थापन प्रणाली विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रगतीची ३६० डिग्री माहिती शिक्षकांना, तसेच पालकांना देते.

‘नेक्स्ट एज्युकेशन’ने शिक्षण व्यवस्थापन प्रणाली (एलएमएस) विद्यार्थ्यांना सानुकूल शिक्षण मजकूर आणि तपशीलवार अभ्यास योजनेचा अॅक्सेस मिळवण्यास सक्षम बनवत असून, ती त्यांना अनुकूल मुल्यांकनाद्वारे मिळालेल्या ज्ञानाला मोजण्याची संधी देते आणि सखोल ज्ञान मिळवण्यासाठी प्रेरित करते. एलएमएस मोठ्या प्रमाणात शिक्षकांचा भार कमी करण्याबरोबरच अभ्यासक्रमाचे व्यवस्थापन करणे व गृहपाठ आणि विद्यार्थ्यांच्या प्रदर्शनाचा मागोवा ठेवण्याचेही काम करते.

या विषयी माहिती देताना ‘नेक्स्ट एज्युकेशन’चे सीईओ व सह-संस्थापक बियास देव रल्हन म्हणाले, ‘भारतामध्ये असे बरेच विद्यार्थी आहेत जे योग्य शैक्षणिक बेंचमार्क आणि शिकण्याच्या परिणामांना मोजण्याच्या प्रभावी मार्गांच्या अभावामुळे प्रगती करू शकत नाही. नेक्स्ट लर्निंग मंचावर एलएमएसचा स्वीकार करणे हे भारतामध्ये शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या दिशेने एक क्रांतिकारी पाऊल ठरू शकते. कारण जेव्हाही विद्यार्थी शिक्षणाच्या मार्गावरून विचलित होत असेल तेव्हा विद्यार्थ्याने शिक्षणात केलेल्या प्रगतीचा मागोवा घेऊ शकते आणि सुधारात्मक उपाययोजना सुचवू शकते.’
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language