Ad will apear here
Next
श्रावणानिमित्त श्री परमेश्वर मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
हिमायतनगर : श्रावण महिन्यानिमित्त हिमायतनगरमधील श्री परमेश्वर मंदिर देवस्थानाच्या वतीने २१ दिवसांत शिवपुराण, भागवत व संगीत रामायण कथा अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

प्रति वर्षी श्रावण महिन्यात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. तीन ऑगस्ट रोजी शिवपुराण कथेने कार्यक्रमांची सुरुवात होणार आहे. भोलेनाथांच्या विविध लीला आणि त्यांचे झाकीच्या स्वरूपात दर्शन उपस्थितांना घडविले जाणार आहे. ह. भ. प. भागवताचार्य महेशमहाराज महाजन (आळंदी) यांचे प्रवचन होणार आहे. याचा समारोप १० ऑगस्ट रोजी भव्य महाप्रसाद वितरणाने केला जाणार आहे. १२ ऑगस्टपासून संगीतमय रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे. ह. भ. प. भागवताचार्य विदर्भकेशव स्वामी सारंग चैतन्यजी महाराज अमरावतीकर उपस्थित भक्तांना मर्यादापुरुषोत्तम रामाच्या कार्याची गाथा सांगणार आहेत. या कथेचा समारोप १९ ऑगस्ट रोजी महाप्रसाद वितरणाने केला जाणार आहे. 

२१ ऑगस्टपासून संगीतमय भागवत कथेचे आयोजन करण्यात आले असून, भागवताचे प्रवचन ह. भ. प. भागवताचार्य सुनीलमहाराज आष्टीकर करणार आहेत. त्यांच्या मधुर वाणीतून आणि सहकाऱ्यांसोबत ते श्रीकृष्णाच्या लीला झाकीतून साकारणार आहेत. भागवत कथा सोहळ्याचा समारोप २८ ऑगस्ट रोजी भव्य महाप्रसाद पंगतीने केला जाणार आहे. तीनही धार्मिक प्रवचने व संगीत कथा श्रवण कार्यक्रम श्री परमेश्वर मंदिर सभागृहात दररोज दुपारी एक ते पाच या कालावधीत होणार आहेत. 

श्रावण मासात आयोजित केलेल्या या धार्मिक कार्यक्रमांचा लाभ सर्व भक्तांनी घ्यावा, असे आवाहन परमेश्वर मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरसेठ श्रीश्रीमाळ यांनी केले आहे.

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language