Ad will apear here
Next
‘अजि म्या परदेस पाहिला’ पुस्तकाचे प्रकाशन
‘बुकगंगा’वर ई-बुकही उपलब्ध
पुस्तकाचे प्रकाशन करताना मान्यवर

लांजा :
 आधी अगदी हिमालयही न पाहिलेल्या एका स्त्रीला थेट स्वित्झर्लंडमध्ये जाण्याची संधी मिळाली आणि तेथील बर्फाच्छादित जगाची २२ दिवस सफर करता आली, तर तिचे अनुभव किती अविस्मरणीय असतील ना! लांजा (जि. रत्नागिरी) येथील विजयालक्ष्मी देवगोजी यांना अशी संधी मिळाली. त्यांनी घेतलेले मनोहारी अनुभव केवळ स्वतःपुरते मर्यादित न ठेवता प्रवासवर्णनरूपाने ते अनुभव शब्दबद्ध केले. ‘अजि म्या परदेस पाहिला’ या त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच लांज्याजवळच्या केळंबे या गावात झाले. अमरल प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले असून, ‘बुकगंगा डॉट कॉम’वर ते ई-बुक स्वरूपात उपलब्ध आहे.

विजयालक्ष्मी देवगोजी या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या (कोमसाप) लांजा शाखेच्या संचालिका आहेत. त्यांनी लिहिलेल्या ‘अजि म्या परदेस पाहिला!’ या पुस्तकाचे प्रकाशन लांजा येथील प्रथितयश डॉक्टर अनिल पत्की यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ लेखक, रंगकर्मी अनिल दांडेकर, ज्येष्ठ साहित्यिक अॅड. विलास कुवळेकर, लांज्यातील कला-वाणिज्य-विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत नुकतेच झाले. 

लांज्याजवळच्या केळंबे या गावात असलेल्या प्रसिद्ध इंजिनीअर गनी हसन मुलाणी यांच्या सानिया स्विमिंग आणि ग्रीन रिसॉर्टमध्ये हा सोहळा झाला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन आणि सरस्वती प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. 

‘कोमसाप’चे दिवंगत सभासद आणि समाजातील अन्य दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सौ. पोकळेकर यांनी स्वागतपद्य आणि ईशस्तवन म्हटले. लांजा ‘कोमसाप’चे माजी अध्यक्ष गजानन जगताप यांनी प्रास्ताविक केले. 

डॉ. अनिल पत्की, अनिल दांडेकर, अॅड. विलास कुवळेकर, प्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी यांच्यासह ‘कोमसाप’चे केंद्रीय संचालक तथा माजी जिल्हाध्यक्ष सुरेश खटावकर, उपाध्यक्ष रामचंद्र जाधव, संचालिका डॉ. माया तीरमारे यांनी मनोगते व्यक्त केली. लेखिका सौ. देवगोजी यांनीदेखील आपले मनोगत व्यक्त केले. मधुलिका देवगोजी हिने पुस्तकातील एका पानाचे अभिवाचन केले. 

या वेळी लांज्यातील लोकमान्य वाचनालयाचे उपाध्यक्ष विजय बेर्डे, न्यू एजुकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊ वंजारे, ज्येष्ठ साहित्यिक गजानन वाघधरे, लांज्याच्या संस्कृती फाउंडेशनचे अध्यक्ष गौतम कांबळे, प्राध्यापक धनंजय क्षीरसागर, डॉ. गुजर, ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर, ज्येष्ठ रंगकर्मी अमोल रेडीज, ज्येष्ठ कवी प्रमोद कोळेकर, दीपाली कुलकर्णी, संस्कृती फाउंडेशनचे संघटक सिद्धेश पांचाळ, किशोर मानकर, गनी हसन मुलाणी, सौ. पत्की, अतुल पत्की, सागर पेणकर, मिलिंद हळबे, पवार मेस्त्री यांच्यासह अनेक मान्यवर आणि विजयकुमार देवगोजींसह देवगोजी कुटुंबीय उपस्थित होते. आभारप्रदर्शन रमाकांत देवगोजी यांनी केले. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ‘कोमसाप’च्या लांजा शाखेचे उपाध्यक्ष रामचंद्र जाधव, केंद्रीय संचालक सुरेश खटावकर, जिल्हा प्रतिनिधी संजय गोसावी, खजिनदार संजय बुटाला, सचिव विनोद बेनकर, संचालक गजानन जगताप, डॉ. माया तीरमारे, सौ. मुलाणी आदींनी मेहनत घेतली. 

(‘अजि म्या परदेस पाहिला’ हे पुस्तक ई-बुक स्वरूपात ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून खरेदी करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.)

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language