Ad will apear here
Next
स्वरसम्राज्ञीला एकाच वेळी ९० मैफलींद्वारे शुभेच्छा! पुण्यातही रंगला कार्यक्रम!


पुणे :
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना शनिवारी (२८ सप्टेंबर) ९० वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने राज्यभरात एकाच वेळी ९० मैफलींचे आयोजन करण्यात आले होते. यापैकी एक मैफल ब्रिटनमध्ये झाली. पुण्यातील मैफल नव्या पेठेतील प्रभू ज्ञान मंदिरात सादर झाली. या मैफलीला पुणेकर रसिकांची दाद मिळाली. ‘स्वरस्वती’ या नावाने एकाच वेळी झालेल्या ९० ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमाची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

‘हार्मनी इव्हेंट्स’ या नागपूरच्या संस्थेने या कार्यक्रमाची निर्मिती केली होती. राजेश समर्थ यांची ही संकल्पना होती. पुणे, ठाणे, मुलुंड, औरंगाबाद, नागपूर, मुंबई अशा ९० ठिकाणी एकाच वेळी हा कार्यक्रम सादर झाला. याआधी एकाच वेळी झालेल्या ७३ मैफलींचा जागतिक विक्रम मोडण्याचा प्रयत्न या ९० मैफलींद्वारे करण्यात आला आहे. याबाबत ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ला कळवण्यात आले असून, लवकरच त्याबाबत संस्थेकडून कळवले जाणार आहे.

पुण्यातील मैफलीचे आयोजन गायिका रेवती सुपेकर यांनी केले होते. सुपेकर यांनी ‘आएगा आनेवाला आयेगा’ या गीताने मैफलीला प्रारंभ केला, तर ‘ऐ मेरे वेतन के लोगो’ या ऐतिहासिक गीताने मैफलीची सांगता झाली. सलग अडीच तास रंगलेल्या या मैफलीत एकामागोमाग एक अशी लतादीदींची सदाबहार गीते सादर झाली. उत्तरोत्तर मैफल अधिकाधिक रंगत गेली, तसा रसिकांचाही प्रतिसादही वाढत गेला.

लतादीदींची हजारो गीते रसिकांच्या मनात रुंजी घालतात; पण वेळेच्या मर्यादेमुळे मैफलीत काही मोजक्या गीतांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये आयेगा आनेवाला, ठंडी हवायें, ये जिंदगी उसी की है, आजा रे मैं तो, लग जा गले, ओ सजना, प्यार किया तो, पिया तोसे नैना, जिया लागेना, ओ चाँद जहाँ वो जाये, अपलम चपलम, गोरे गोरे, रहे ना रहे हम, ऐ मेरे वतन के लोगो आदी गाण्यांचा समावेश होता. लतादीदींसोबत मन्ना डे, हेमंत कुमार, मुकेश, तलत महमूद, किशोर कुमार आणि महम्मद रफी या नामवंत गायकांनी गायलेल्या ये रात ये चांदनी, आहा रिमझिम के ये प्यारे, ये रात भिगी भिगी, दिल की नजर से, जो वादा किया वो, तेरे बिना जिंदगी से कोई या युगलगीतांचाही मैफलीत समावेश होता.



रेवती सुपेकर यांच्यासह केतकी देशपांडे, रेश्मा कापशीकर, करिश्मा गडकरी, नेहा वैशंपायन, अभिजित नांदगावकर या गायक कलाकारांनी ही गीते सादर करून मैफलीत रंग भरले. संतोष कुलकर्णी, अभिजित भदे, किरण एकबोटे, नंदू फौजदार या वादक कलाकारांची अप्रतिम साथ गायकांना लाभली. डॉ. मानसी अरकडी यांनी निवेदन केले. मैफलीच्या शेवटी सुपेकर यांनी आयोजक या नात्याने सर्वांचे आभार व्यक्त केले.

(पुण्यातील कार्यक्रमात सादर झालेल्या गाण्यांची छोटीशी झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत...)

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi