Ad will apear here
Next
महाजनादेश यात्रेनंतर लगेचच सिंहगड रस्त्यावर साफसफाई
नगरसेविका मंजूषा नागपुरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचा उपक्रम


पुणे :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा १५ सप्टेंबर रोजी सिंहगड रस्त्यावरून खेड-शिवापूर कडे मार्गस्थ झाली. या यात्रेचे नगरसेविका मंजूषा नागपुरे यांच्याकडून जोरदार स्वागत करण्यात आले. फुलांच्या पाकळ्यांची पुष्पवृष्टी रथावर व मुख्यमंत्र्यांवर करण्यात आली. या उपक्रमात स्थानिक नागरिक व तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. 



महाजनादेश यात्रा पुढे जाताच उपस्थित कार्यकर्त्यांनी आधीच आणलेले झाडू हातात घेतले आणि परिसराची लगेचच स्वच्छता केली. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचा संकल्प पाळण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. आपल्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडू नये, यासाठी लगेचच परिसराची स्वच्छता करण्याचे नियोजन केले होते,’ असे नागपुरे यांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. 
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi