Ad will apear here
Next
‘भाजप’तर्फे हिमायतनगरमध्ये सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली


हिमायतनगर :
देशाच्या माजी परराष्ट्रमंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे सहा ऑगस्टला आकस्मिक निधन झाले. भारतीय जनता पक्षाच्या हिमायतनगरमधील कार्यकर्त्यांनी त्यांना सात ऑगस्ट रोजी श्रद्धांजली वाहिली. परमेश्वर मंदिर येथे हा कार्यक्रम झाला.



त्यांच्याविषयी बोलताना भाजपचे कार्यकर्ते डॉ. डोंगरगाव म्हणाले, ‘सुषमा स्वराज यांच्या निधनाची बातमी भारतभर वाऱ्यासारखी पसरली. सर्वांप्रमाणेच मलाही दुःख अनावर झाले. त्यांच्या कार्याची उणीव भाजपला नेहमी जाणवत राहील.’ त्यांनी स्वराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.



या वेळी ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण शक्करगे, भाजप तालुकाध्यक्ष आशिषभाऊ सकवान, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी, शहराध्यक्ष खंडू चव्हाण, सूरज दासेवार, बालाजी ढोणे, गजानन हरडपकर, विलास वानखेडे, सुधाकर चिट्टेवाड, दुर्गेश मंडोजवार, शत्रुघ्न हेंद्रे, रामेश्वर हेंद्रे, गुरू हेंद्रे, आदर्श हेंद्रे यांच्यासह उपस्थित असलेल्या नागरिकांनी सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली अर्पण केली. 

(सुषमा स्वराज यांच्याबद्दलचा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language