Ad will apear here
Next
पूरग्रस्तांसाठी ‘माय लाइफस्टाइल मार्केटिंग’कडून २५ लाखांची मदत


मुंबई :
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्तांसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. डायरेक्ट सेलिंग व्यवसायातील अग्रगण्य असलेल्या ‘माय लाइफस्टाइल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीकडून २५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीला करण्यात आली. या मदतीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नुकताच सुपुर्द करण्यात आला. 

या वेळी निखिल चंदन, कंपनीचे व्हाइस चेअरमन आलोक पांडे, एस. एम. चौधरी, राजेश यादव, डी. एच. कदम, कीर्तिदा अजमेरा, शंकेश वाहाळे, किशोर अहिरे, संजय वाभळे, नीलेश पटलेकर यांची उपस्थिती होती. ‘माय लाइफस्टाइल’कडून नैसर्गिक आपत्तीच्या काळात केरळ, आसाम राज्यालाही आर्थिक मदत करण्यात आली आहे. भारत सरकारच्या कौशल्य विकास योजनेत माय लाइफस्टाइल कंपनी सहभागी झाली आहे. अशी माहिती नॅशनल टीम कोऑर्डिनेटर रवी गायकर यांनी दिली. 
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language