Ad will apear here
Next
रोपळे गावातील पाटील विद्यालयात ई-लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम


सोलापूर :
रोपळे (ता. पंढरपूर) येथील श्री. शिवाजीभाऊ बाबा पाटील विद्यालयात ई-लर्निंगच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे गावाच्या शैक्षणिक विकासात भर पडत आहे. 

ग्रामीण भागातील विद्यार्थांना चांगल्या शिक्षणापासून वंचित राहावे लागते. अशा परिस्थितीत रयत शिक्षण संस्थेच्या पाटील विद्यालयात मात्र गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे आसपासच्या खरातवाडी, बाभूळगाव, तुंगत, येवती व मेंढापूर या गावातील विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. या विद्यालयात विविध उपक्रम राबवले जात आहेत. गुरुकुल प्रकल्पांतर्गत विद्यार्थांना ई-लर्निंगद्वारे शिकविले जात आहे. त्यासाठी सात वर्गखोल्यांमध्ये प्रोजेक्टरची सोय करण्यात आली आहे. सुसज्ज संगणक लॅब, गणित प्रयोगशाळा, भाषा विषयाची वेगळी वर्गखोली, मिनी सायन्स सेंटर आदी गोष्टींमुळे विद्यार्थ्यांचे अध्ययन सोपे झाले आहे. 

मराठी भाषेचे उत्तम ज्ञान मिळू लागल्यामुळे या प्रशालेतील काही विद्यार्थी कवितालेखनही करू लागले आहेत. स्कॉलरशिप, आरटीएस, एनटीएस, एनएमएमएस, रयत ऑलिंपियाड, गांधी रिसर्च फाउंडेशनची परीक्षा इत्यादी स्पर्धा परीक्षांची विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेतली जाते. चित्रकलेच्या एलिमेंटरी ग्रेड व इंटरमिजिएट परीक्षेतही विद्यार्थी चमकू लागले आहेत. विद्यार्थ्यांची संशोधनवृत्ती जागृत करण्यासाठी विज्ञान प्रदर्शन भरवले जात असते. इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतची विद्यार्थिसंख्या एक हजार ९४ आहे. या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था चांगली करण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक बी. यू. पाटील यांनी नव्याने सहा वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यासाठी संस्थेची परवानगी घेतली असल्याचे सांगितले. याचे बजेट सुमारे ४० लाख रुपये आहे. लवकरच या वर्गखोल्यांचे बांधकाम सुरू केले जाणार आहे. 

मुख्याध्यापक श्री. पाटील, पर्यवेक्षक सी. एस. पाटील व शिक्षकवर्ग विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देत असल्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता वाढीचा आलेख वाढत चालला आहे. ग्रामस्थांचे या शाळेला नेहमीच सहकार्य मिळत आहे. गावाचे सुपुत्र व भूमिअभिलेख अधिकारी शिवाजी भोसले यांनी अॅरोफिल्टर, स्पर्धा परीक्षा पुस्तक संच व बाके दिली आहेत. आता त्यांनी काही उद्योजकांच्या मदतीने सुमारे चार लाख रुपये किमतीचे दहा संगणक शाळेला मिळवून देणार असल्याचे मुख्याध्यापक श्री. पाटील यांना सांगितले. 

जनरल बॉडी सदस्य बाळासाहेब पाटील, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य शिवाजी पाटील, नागनाथ माळी, नारायण गायकवाड यांच्याबरोबरच ग्रामस्थांचे शाळा सुधारण्यासाठी सहकार्य लाभत असल्याचे त्यांनी सांगितले. भौतिक सुविधांतही ही प्रशाला मागे नाही. या प्रशालेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. मुली व मुलांसाठी वेगळे शौचालय व पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय केली गेली आहे. हात धुण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्याबरोबरच त्यांना दर्जेदार माध्यान्ह भोजन दिले जात आहे.मुख्याध्यापक बिभीषण पाटील व पर्यवेक्षक चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दीपाली फटे, कल्लेश्वर पानसांडे, संतोष रोकडे, नितीन वाघमारे, आप्पासाहेब कंदले, नूतन समर्थ, संजय मोरे, रवींद्र क्षीरसागर, प्रदीप कापसे, पांडुरंग सोनेवाड, विलास वाडेकर, तानाजी ननवरे, शुभांगी राऊत, महादेवी लंकेश्वरी, राजकुमार व्यवहारे, चंद्रकांत मलपे, सोमनाथ जगताप, शुभांगी राऊत, अंकुश भोसले, विद्या शिंदे, मोहन गिरी आदी रयत सेवक विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्न करीत आहेत. 

‘गोरगरिबांच्या मुलांना ई-लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण मिळू लागल्यामुळे या शाळेचा गावाला अभिमान आहे,’ असे सरपंच दिनकर कदम यांनी सांगितले.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi