Ad will apear here
Next
वनौषधींच्या नर्सरीतून जपली सामाजिक बांधिलकी
नाशिक : नाशिक रोड येथील उद्योजिका माधवी निसाळ यांनी पाचशेहून अधिक प्रकारच्या आयुर्वेदीय वनस्पती अर्थात वनौषधींची जोपासना करून नर्सरी फुलवली आहे. तसेच, सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून त्यांनी अनेक संस्था आणि शाळांमध्ये वनौषधींची मोफत लागवडही करून दिली असून, लागवडीसंदर्भात मोफत मार्गदर्शनही त्या करतात. 

नाशिकमधील नांदुरा नाक्याजवळ असणाऱ्या माधवी निसाळ यांची महारुद्र हायटेक नर्सरी आहे. नाशिक रोड परिसरच नव्हे, तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील नागरिक या नर्सरीतून वनौषधींची रोपे खरेदी करण्यासाठी गर्दी करीत असतात. 

पारंपरिक नोकरी करण्यापेक्षा काही तरी वेगळे करावे हे स्वप्न माधवीताईंनी पाहिले होते. मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या इगतपुरी महाविद्यालयातून बीकॉम झालेल्या माधवीताईंनी हटके व्यवसाय करायचे ठरवले. अरुंधती व अक्षरा या दोन कन्यांना सांभाळून त्यांनी आपली हायटेक नर्सरी वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली आहे. पती योगेश निसाळ यांची उत्तम साथ त्यांना आहे. या नर्सरीमुळे १५ जणांना रोजगारही मिळाला आहे.

आपल्या व्यवसायातून समाजाचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि वनौषधी संवर्धनासाठी हातभार लागला पाहिजे, हा माधवीताईंचा हेतू. त्यांच्या एक एकर क्षेत्राच्या नर्सरीत आज पाचशेहून अधिक प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत. ताम्हण, अर्जुन सादडा, खैर, शिरीष, साग, हिरडा, कैलासपती, भीम कापूर, मारवा, अक्कलकाढा, सुगंधी निलगिरी, आंबा, साग, ओवा, रक्तचंदन, पानफुटी, एकदांडी लसूण, पांढरी रुई, मसाल्याची झाडे, जांभूळ, चिंच, फणस, नारळ, रिठा, ब्राह्मी, वेखंड, शतावरी, लेंडी पिंपळी, गुळवेल, गुग्गुळ, गावठी कोरफड अशा विविध प्रकारच्या ५००हून अधिक औषधी वनस्पतींची रोपे त्यांच्या नर्सरीत आहेत. 

त्यांनी गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम, रत्नागिरी, उत्तर प्रदेश अशा विविध भागांतून ही झाडे आणलेली आहेत. कडकनाथ कोंबडी, ससे, गावठी कोंबड्याही त्यांनी पाळल्या असून, कडकनाथ कोंबडीची अंडी खरेदी करण्यासाठीही नागरिक येत असतात. 

समाजाचे आपण काही देणे लागतो, या विचाराने माधवीताईंनी नाशिक रोडमध्ये आजपर्यंत अनेक संस्था आणि शाळांना वनौषधींची मोफत लागवड करून दिली आहे. त्यामुळे त्यांचा अनेक व्यक्ती आणि संस्थांनी यथोचित सन्मान केला आहे. अनेक संस्थांमध्ये उद्यान विकासित करण्याबरोबरच कॉर्पोरेट सेक्टरमध्येही माधवी निसाळ यांनी नंदनवन फुलवले आहे. लागवड कशी करतात, खते, औषधे कोणती वापरावीत, लहानशा जागेत हिरवळ कशी निर्माण करावी, यासंबंधी विद्यार्थी आणि महिलांना माधवीताई मोफत मार्गदर्शन करतात. 

‘जुने गावठी वृक्ष नामशेष होत असतानाच अशा झाडांचे संवर्धन करणे हा आमचा उद्देश आहे,’ असे माधवी निसाळ यांनी सांगितले.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language