Ad will apear here
Next
‘आचार्य अत्रें’वरही येणार बायोपिक
‘बायोपिकस्टार’ सुबोध भावेच्या नावाची चर्चा..

मुंबई : बॉलीवूडप्रमाणेच मराठी चित्रसृष्टीतही चरित्रपटाचे वारे सुरू झाले आणि पाहता पाहता ‘पुलं’, डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्यानंतर आता मराठीतील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्यावरही चरित्रपट येणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक राजेश देशपांडे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून अत्रेंच्या भूमिकेसाठी बायोपिक स्टार सुबोध भावे याच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे. 

आचार्य अत्रेअभिनेता, लेखक राजेश देशपांडे आणि श्रीकांत बोजेवार हे या चरित्रपटाचे लेखन करत आहेत. श्रीकांत बोजेवार यांनी या सिनेमाच्या संदर्भात फेसबुकवरून केलेल्या पोस्टवरून या चरित्रपटाबद्दल चर्चा सुरू झाली. आचार्य अत्रे म्हणजेच प्रल्हाद केशव अत्रे. खरे तर अत्रेंची भूमिका साकारणे म्हणजे एक मोठे दिव्यच आहे. हे काम खूप जोखमीचे आहे. अत्रेंच्या व्यक्तिमत्त्वाला अनेकविध पैलू आहेत. ते सगळे अगदी तशाच प्रकारे येणे अपेक्षित आहे. त्यामुळे हे एक खूप मोठे आव्हान आहे. 

चित्रपटाच्या लेखनाबाबत आणि इतर बाबींसंदर्भात राजेश देशपांडे यांनी सांगितले असले, तरी अद्याप चित्रपटात कोणते कलाकार असतील याबद्दल कोणतीच अधिकृत माहिती सांगितली गेलेली नाही. चित्रपटाची संहिता लिहून पूर्ण झाल्यानंतर चित्रपटातील कलाकारांबद्दल विचार केला जाणार आहे, असे देशपांडे यांनी सांगितले आहे. शिक्षक, लेखक, पत्रकार, नाटककार, चित्रपटकार असे आचार्य अत्रे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. समाजातील घडामोडींवर भाष्य करणाऱ्या अनेक कलाकृती त्यांनी घडवल्या आहेत. 

दरम्यान या चित्रपटाची बातमी समोर येताच चर्चा होऊ लागली, ती अभिनेता सुबोध भावेच्या नावाची. मराठीतील सर्वाधिक चरित्रपट करणारा अभिनेता म्हणून सुबोध भावेला ओळखले जाते. बालगंधर्व, लोकमान्य टिळक, डॉ. काशिनाथ घाणेकर अशा दिग्गजांच्या भूमिका सुबोध भावेने त्यांच्या चरित्रपटांमधून केल्या आहेत. त्यामुळे ‘आचार्य अत्रें’सारख्या अवलियाची भूमिका पेलण्यासाठी प्रेक्षकांनी सुबोधच्या नावाची चर्चा करणे साहजिक आहे. 

साहित्य, लेखन, नाटक या पैलूंबरोबरच राजकीय पत्रकारिता हे आचार्य अत्रेंच्या चरित्राचे एक प्रमुख अंग आहे. त्यांचे ‘कऱ्हेचें पाणी’ आत्मचरित्र पाच खंडांमध्ये आहे. यावरूनच त्यांच्या आयुष्यातील कार्यकालाचा आवाका लक्षात येतो. त्यामुळे त्यांची भूमिका साकारणे हे खरोखर खूप मोठे आव्हान आहे. या भूमिकेसाठी खरेच सुबोध भावेची निवड केली जाते, का दुसऱ्या कोणत्या कलाकाराच्या खांद्यावर ही धुरा सोपविली जाते, हे पाहणे औत्सुक्याचे असेल. 
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language