Ad will apear here
Next
‘अजरख’ या प्राचीन स्वदेशी कलेबाबत उदासीनता
प्रसिद्ध कापड छपाई कलाकार सुफीयान खत्री यांची खंत
पुणे : ‘भाज्या, फळे यांच्या नैसर्गिक रंगाद्वारे ‘ब्लॉक प्रिंटींग’ करून कापडावर ‘अजरख’ कलाकारी करण्याची फार प्राचीन कला कच्छमध्ये आजही जपली जात आहे. कलाकारांनी अनेक आव्हाने पेलत जपलेल्या या कलेला परदेशातील डिझायनर फार सन्मान देतात. हे डिझायनर आमच्यासोबत एकत्र काम करण्यास मोठ्या संख्येने पुढे येतात. भारतात मात्र या कलेविषयी त्या प्रकारची उत्सुकता दिसून येत नाही, तसेच भारतीय डिझायनर स्थानिक अजरख कलाकारांबरोबर काम करण्यासही विशेष उत्सुक नसल्याचा अनुभव येतो,’ अशी खंत प्रसिध्द ‘अजरख’ कलाकार सुफीयान खत्री यांनी व्यक्त केली. 

रुद्राक्ष या स्टायलिंग स्टुडिओच्या संस्थापिका रसिका वाकळकर यांच्या संकल्पनेतून ‘द फॅशन नॅरेटिव्ह’ या दोन दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे रेल्वे स्थानकाजवळ राजा बहादूर सिटी सेंटर येथील ‘द मिल्स’मध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या वेळी कापड बनवण्याची व रंगवण्याची कला यावर आधारित विविध पैलूंवर चर्चा व कार्यशाळा घेण्यात आल्या. यात ‘अजरख’ या कापडावरील छपाई कलेवर प्रकाश टाकताना खत्री बोलत होते. कच्छचे ज्येष्ठ विणकर चमन सिजू, ‘इथिकस’ या शाश्वत फॅशन ब्रँडच्या संस्थापिका विजयलक्ष्मी नचियार आदी या वेळी उपस्थित होते. 

‘‘अजरख’ ही अत्यंत कौशल्याची कला असून, यात कापडाचा एक नमुना तयार होण्यासाठी १६ वेगवेगळ्या प्रक्रिया कराव्या लागतात,’ असे खत्री यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘यासाठी लागणारे छापेच तयार व्हायला १५ दिवस लागतात. हे अत्यंत शांतपणे व चिकाटीने करण्याचे काम आहे. एक-एक प्रक्रिया करण्यासाठी बराच कालावधी द्यावा लागतो. दुष्काळ, भूकंप यामुळे येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती, आर्थिक आपत्ती या सगळ्याला तोंड देत आणि काळाप्रमाणे आपल्या नक्षीकामात बदल करत अजरख कलाकारंनी ही कला टिकवली.’

‘अनेकांना डिजिटल व स्क्रीन प्रिंटिंगचे कापड अजरख कापडापेक्षा स्वस्त कसे, असा प्रश्न पडतो; पण ज्या व्यक्तीला या कलेतील कष्ट माहीत  आहेत, त्यांच्याकडून अजरख कपड्याची किंमत कमी करण्याचा आग्रह कधीच धरला जाणार नाही,’ असेही खत्री म्हणाले. 
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language