Ad will apear here
Next
पुण्यात साकारणार देशातील पहिली हरित टाउनशिप
पीएमआरडीए आणि स्वित्झर्लंड सरकारचा उपक्रम
कार्बन न्यूट्रल स्मार्ट सस्टेनेबल टाऊनशिपसंदर्भातील करारावर कॉन्सूल जनरल ओथमार हारदेगार, विक्रम कुमार व माधव भागवत यांनी सहया केल्या.

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि स्वित्झर्लंड सरकारने अधिकृत केलेल्या २००० व्हॅट स्मार्ट सिटी असोसिएशन यांच्या वतीने आता पुण्यामध्ये भारतातील पहिली कार्बन न्यूट्रल स्मार्ट सस्टेनेबल टाउनशिप अर्थात हरित टाउनशिप उभारण्यात येणार असून, यासंदर्भात गुरुवारी (१९ सप्टेंबर) पुण्यात एक सामंजस्य करार करण्यात आला. 

स्वित्झर्लंडचे भारतातील कॉन्सूल जनरल ओथमार हारदेगार, पीएमआरडीएचे आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम कुमार, २००० व्हॅट स्मार्ट सिटी असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माधव भागवत यांनी या सामंजस्य करारावर सहया केल्या. 

पीएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्त व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कविता द्विवेदी, पीएमआरडीएचे मुख्य अभियंते विवेक खरवडकर, २००० व्हॅट स्मार्ट सिटी असोसिएशनचे स्थानिक भागीदार निखील दिक्षीत आदी या वेळी उपस्थित होते.


या वेळी बोलताना स्वित्झर्लंडचे भारतातील कॉन्सूल जनरल ओथमार हारदेगार म्हणाले, ‘भारत आणि स्वित्झर्लंड या दोन्ही देशांत तब्बल ७१ वर्षांचे मैत्रीपूर्ण संबंध असून, शाश्वत विकासासंदर्भात स्वित्झर्लंड हा नेहमीच भारताला मदत करण्यासाठी तयार असेल. २००० व्हॅट स्मार्ट सिटी असोसिएशन अंतर्गत कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टीने भारताने उचललेले हे पाऊल स्वागतार्ह असून, आमच्याकडे असलेले आधुनिक तंत्रज्ञान, अनुभव आणि या क्षेत्रातील ज्ञान याद्वारे आम्ही भारताला पूर्ण सहकार्य करू.’

या उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना विक्रम कुमार म्हणाले, ‘जागतिक स्तरावर भारताला उदयोन्मुख विकास केंद्र बनविण्याच्या दृष्टीने पीएमआरडीए विभागात कार्बन न्यूट्रल, स्मार्ट, शाश्वत आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य टाउनशिप विकसित व्हाव्यात या दृष्टीने आम्ही सकारात्मक पाऊले उचलत आहोत. स्वित्झर्लंड सरकार यासाठी आम्हाला मदत करीत असून, त्याद्वारे सर्व्हिस इंडस्ट्री क्लस्टर, अॅग्रीकल्चर क्लस्टर आणि टुरिझम क्लस्टर अशा संकल्पनेवर एकूण १२ टाउनशिप उभारण्याचा आमचा मानस आहे. जागतिक तापमानवाढीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीकोनातून करण्यात आलेल्या सीओपी २१ पॅरिस कराराने निश्चित केलेल्या उद्दिष्टांनुसार नियामक आराखड्याचा अवलंब करीत स्वित्झर्लंड सरकार या आधीपासून कार्यरत असून त्यांची मदत हे आमच्यासाठीदेखील एक महत्त्वाचे पाऊल असेल.’      

‘२००० व्हॅट स्मार्ट सिटी असोसिएशनच्या सहकाराने पुढील दिड वर्षांत अशा विविध टाउनशिप प्रकल्पांच्या अंतर्गत सुमारे एक कोटी अमेरिकन डॉलर इतकी गुंतवणूक होणे अपेक्षित आहे. याबरोबरच स्थानिकांना शाश्वत विकासाच्या दृष्टीने कार्बन न्यूट्रल, स्मार्ट टाउनशिप देण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही प्रयत्नशील आहोत,’असे माधव भागवत यांनी सांगितले.  
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi