Ad will apear here
Next
‘रमाई आवास योजनेसाठी साडेतीन कोटींचा निधी मंजूर’
हिमायतनगरचे नगराध्यक्ष कुणाल राठोड यांची माहिती
हिमायतनगर : ‘शहरातील अनुसूचित जातींंतील व नवबौद्ध नागरिकांना आपल्या हक्काची घरे मिळण्यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाच्या निर्देशानुसार समाजकल्याण विभागाकडून हदगाव-हिमायतनगरचे आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगर नगरपंचायतीला रमाई आवास योजनेअंतर्गत तीन कोटी ७७ लाखांचा निधी प्राप्त झाला असून, आता शहरातील अनुसूचित जातींतील व नवबौद्ध घटकांतील लाभार्थ्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे,’ अशी माहिती नगराध्यक्ष कुणाल राठोड यांनी दिली

हिमायतनगर नगरपंचायतमध्ये पुढील अडीच वर्षांसाठी नव्याने सत्तेत आलेले नगराध्यक्ष कुणाल राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी कामाची चांगली सुरुवात केली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून एक हजार २१५ नव्या घरकुलांची मंजूरी, शहरातील विविध विकासकामांसाठी १२ कोटींचा निधी आणि आता आमदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील अनुसूचित जाती व नवबौद्ध नागरिकांना रमाई आवास योजनेअंतर्गत तीन कोटी ७७ लाखांचा निधी मंजूर करून आणला आहे. यात ‘रमाई आवास’मधील ज्या कुटुंबधारकांचे वार्षिक उत्त्पन्न तीन लाखांपर्यंत आहे, अशा पात्र लाभार्थ्यांचा प्रस्ताव समाजकल्याण विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात आला होता. त्या नुसार प्रस्तावाची तपासणी करून समाजकल्याण विभागाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ‘रमाई आवास’साठी एवढा निधी प्राप्त झाला आहे. 

कुणाल राठोडया योजनेअंतर्गत शहरात लवकरच घरकुलांच्या बांधकामाला सुरुवात केली जाणार असून, त्यासाठी नागरिकांनी नगर पंचयातीला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी केले आहे. ते म्हणाले, ‘रमाई आवास योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाखांपर्यंत आहे आणि संबंधित लाभार्थ्याने यापूर्वी शासनाच्या कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नाही अशाच लाभार्थ्यांचा यात समावेश असेल.’ 

या घरकुलाचा लाभ कुटुंबातील एकाच व्यक्तिस देण्याचे स्पष्ट निर्देश असून, नगरपंचयात कार्यालयात अर्ज सादर केलेल्या व निकषांची पूर्तता करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांच्या घरोघरी जाऊन लाभार्थ्यांना या बाबत सविस्तर माहिती देण्यात येणार आहे; तसेच प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून नगरपंचायतीमार्फत मोजमाप देण्यात येईल. त्यानंतरच लाभार्थ्यांनी घरकुल बांधकामास सुरुवात करण्याचे आवाहन नगराध्यक्ष राठोड, मुख्याधिकारी डोईफोडे, उपनगराध्यक्ष मोहम्मद जाविद हा.अ.गन्नी, सर्व नगरसेवक-नगरसेविका, नगर अभियंता रफीक अहेमद, रमाई आवास विभागप्रमुख विठ्ठल शिंदे यांनी केले आहे.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language