Ad will apear here
Next
आईमुळे समाजकार्याशी नाळ जोडली गेली : प्रतापराव पवार
अमृतमहोत्सवानिमित्त विद्यार्थी सहायक समितीतर्फे पुण्यात कृतज्ञता समारंभ
विद्यार्थी सहायक समितीतर्फे आयोजित कृतज्ञता समारंभात सुधीर गाडगीळ यांच्या प्रश्नांना उत्तर देताना प्रतापराव पवार व भारती पवार.

पुणे : ‘आईने चांगले संस्कार केले आणि तिच्यामुळेच समाजकार्याशी माझी नाळ जोडली गेली,’ अशा भावना विद्यार्थी सहायक समितीचे आणि ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी व्यक्त केल्या. पवार यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त नऊ ऑक्टोबर रोजी पुण्यात विद्यार्थी सहायक समिती आणि माजी विद्यार्थी मंडळाच्या वतीने ‘अमृतअनुभव’ या कृतज्ञता समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी घेतलेल्या मुलाखतीतून पवार यांच्या आयुष्याचे विविध पैलू उलगडले.

‘अमृतअनुभव’ विशेषांकाच्या ई-बुकचे प्रकाशन करताना ‘बुकगंगा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार जोगळेकर, प्रतापराव पवार, भारती पवार व अन्य मान्यवर

या वेळी कार्यक्रमाला पवार यांच्या पत्नी भारती पवार, स्नुषा मृणाल पवार आणि त्यांचे स्नेही, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रतापराव पवार यांच्या आतापर्यंतच्या वाटचालीबद्दल त्यांचे कुटुंबीय, सहकारी, मित्र यांनी लिहिलेल्या आठवणी विद्यार्थी सहायक समितीने विशेषांक रूपाने या वेळी प्रकाशित केल्या. ‘अमृतअनुभव’ असे त्याचे नाव असून, ‘बुकगंगा पब्लिकेशन्स’तर्फे त्याचे ई-बुक या वेळी प्रकाशित करण्यात आले. ‘बुकगंगा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार जोगळेकर या वेळी उपस्थित होते. प्रतापरावांचे ज्येष्ठ बंधू आणि ज्येष्ठ नेते शरद पवार, नामवंत शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, उद्योजक बाबा कल्याणी, अभय फिरोदिया आदींसह अनेक मान्यवरांचे लेख या पुस्तकात आहेत. 

मुलाखतीवेळी सुधीर गाडगीळ यांनी विचारलेल्या प्रश्नांना प्रतापराव पवार यांनी दिलखुलास उत्तरे दिली. त्यातून त्यांचे समृद्ध अनुभवविश्व उलगडले. ‘सत्कर्म आणि सामाजिक कामावर श्रद्धा ठेव, असे मला माझ्या आईने सांगितले होते. चांगल्या संस्कारांबरोबरच समाजकार्याचे बाळकडू तिने दिले. प्रत्येक गोष्टीत कोणाचे तरी कष्ट आहेत, याची जाणीव ठेवण्याची शिकवण तिने दिली. तिच्यामुळेच माझी सामाजिक कार्याशी नाळ घट्ट जोडली गेली,’ असे पवार म्हणाले.

‘अच्युतराव आपटे यांच्यामुळे मी विद्यार्थी सहायक समितीच्या कामाकडे ओढला गेलो. त्यांच्या आग्रहामुळेच विश्वस्तपद स्वीकारले. निरपेक्षपणे काम करणारी अनेक माणसे आयुष्यात आली. त्यामुळे माझ्यावर निःस्पृहपणे काम करण्याचे संस्कार झाले,’ असेही पवार यांनी सांगितले. 


वृत्तपत्र व्यवसायातील प्रवेशाबद्दल ते म्हणाले, ‘ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी आर्थिक अडचणीत सापडलेले ‘विशाल सह्याद्री’ हे वर्तमानपत्र चालवण्यास सांगितले. वृत्तपत्र चालविण्याचा कोणताही अनुभव नसतानाही इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाच्या जोरावर ते वृत्तपत्र अडचणीतून बाहेर काढले. ‘सकाळ’ चालविण्यासाठी हाच अनुभव मार्गदर्शक ठरला.’

प्रतापराव पवार यांच्या आठवणी, किस्से ऐकण्यात सगळे सभागृह रंगून गेले होते. भारती पवार, मृणाल पवार यांनीही प्रश्नोत्तरांत सहभाग घेतला होता. 
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi