Ad will apear here
Next
‘डीकेटीई’च्या विद्यार्थ्यांची परदेशातील उच्च शिक्षणासाठी निवड
इचलकरंजी : येथील ‘डीकेटीई’च्या टेक्स्टाइल अ‍ॅंड इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूटचे १८ पदवीप्राप्त विद्यार्थी एमएस या पदव्युत्तर शिक्षणासाठी विविध देशांमध्ये रवाना होत आहेत. ‘डीकेटीई’च्या १५ ते २० विद्यार्थ्यांची दर वर्षी उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये निवड होते या वर्षीही ही परंपरा कायम आहे. 

‘डीकेटीई’तून टेक्स्टाइल पदवीप्राप्त अविराज तलप व संपतकुमार खटावकर यांची नेदरलँड येथील सॅक्सीऑन विद्यापीठामध्ये निवड झाली आहे. सम्मेद पाटील, कुलदीप चव्हाण, पवन कुमार व श्‍वेता मोरे यांची २५ लाख स्कॉलरशीपसह चीनमधील उहान विद्यापीठात निवड झाली आहे. शिवतेज गस्ती याची फिलाडेल्फियातील (अमेरिका) थॉमस जेफरसन विद्यापीठात निवड झाली आहे. यश शहा, उल्हास सांगावे, व टी. एम. अक्षत यांची झेक रिपब्लिकमधील लिब्रेस विद्यापीठात निवड झाली आहे.  

बीटेक कॉम्प्युटर सायन्स पदवीप्राप्त अक्षय माळी या विद्यार्थ्याची इंडीयाना युनिर्व्हसिटी-परड्यू युनिर्व्हसिटीत (इंडियनपोलीस, अमेरिका) निवड झाली. अजय माळी मानकऊ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (ऑकलँड, न्यूझीलंड) येथे आणि रोहन जबडे व सिद्धार्थ कोकलकी आरएमआयटी युनिर्व्हसिटी (ऑस्ट्रेलिया) येथे रवाना होत आहेत. राज दिघे याची युनिर्व्हसिटी ऑफ वुलनगाँग (ऑस्ट्रेलिया) येथे निवड झाली आहे.

बीटेक मेकॅनिकल इंजिनीअरिंग पदवीप्राप्त स्नेहा गडकरी हिची मिशिगन टेक्नॉलॉजीकल युनिर्व्हसिटी (अमेरिका), अमित पाटील याची कोनकोर्डीआ विद्यापीठ (कॅनडा) व कृष्णा कोपर्डे याची अ‍ॅरीझोना स्टेट युनिर्व्हसिटी (अ‍ॅरीझोना)येथे निवड झाली आहे. यांनी मेकॅट्रॉनिक्स व फुड प्रोसेसिंग अ‍ॅटोमेशनशी निगडीत प्रोजेक्टवर पेटंट दाखल केले आहेत.

‘‘डीकेटीई’चे परदेशातील २१हून अधिक विद्यापीठांशी सामंजस्य करार आहेत. या कराराअंतर्गत विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शिष्यवृत्ती मिळत आहे. परदेशातील वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये उच्च शिक्षण घेण्यास ‘डीकेटीई’चे १८ विद्यार्थी सज्ज झाले असून, हे विद्यार्थी परदेशातदेखील ‘डीकेटीई’चा ठसा उमटवतील,’ असा विश्‍वास डीकेटीईचे डायरेक्टर डॉ. पी. व्ही. कडोले यांनी व्यक्त केला.

‘डीकेटीईमध्ये प्रथम वर्षापासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कुंडली बनविली जाते. त्याअंतर्गत मला वेळोवेळी मार्गदर्शन मिळत गेल्याने माझे उच्च शिक्षणाचे स्वप्न साकारत आहे. कागल येथून माझे शालेय शिक्षण पूर्ण झाले असले तरी डीकेटीईमुळे शिष्यवृत्तीसह परदेशात जाण्याची संधी मला मिळाली आहे याचा अभिमान व आनंद आहे,’ असे अविराज तलप याने सांगितले.

‘डीकेटीईमध्ये असलेल्या अत्याधुनिक सोयी सुविधा व संशोधनांत्मक शैक्षणिक वातावरण यामुळे उच्च शिक्षण करण्याची चालना मिळाली. डीकेटीईतील तज्ञ प्राध्यपकाच्या मार्गदर्शनाअंतर्गत प्रोजेक्टवर पेटंट दाखल केले व आता अमेरिकेस पुढील शिक्षणासाठी रवाना होत आहे,’ असे स्नेहा गडकरी हिने सांगितले. 
 
या विद्यार्थ्यांना उपसंचालक प्रा. डॉ. यू. जे. पाटील, उपसंचालिका प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे व सर्व विभागप्रमुख यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष प्रकाश आवाडे ट्रेझरर आर. व्ही केतकर व मानद सचिव डॉ. सपना आवाडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi