Ad will apear here
Next
विवाहसोहळ्यांसाठी प्रसिद्ध ‘ऑरिटेल कन्व्हेंशन स्पा अँड वेडिंग रिसॉर्ट’
पुणे/तळेगाव : शानदार विवाहसोहळ्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या ठिकाणांमध्ये आघाडीचे नाव आहे ते तळेगाव येथील ‘ऑरिटेल कन्व्हेंशन स्पा आणि वेडिंग रिसॉर्ट’चे. या रिसॉर्टला ‘ऑरिटेल तळेगाव’ असेही संबोधले जाते. ‘शहरापासून दूर तरीही एक वेगळे शहर’ असा अनुभव देणारे तळेगाव थंड हवामान आणि मुंबई, पुणे या दोन प्रमुख शहरांपासून जवळ असल्यामुळे प्रसिद्ध आहे. 

लोणावळा (समुद्रसपाटीपासून २०४७ फूट उंच) या  लोकप्रिय हिल स्टेशनपेक्षाही तळेगाव (समुद्रसपाटीपासून २२०० फूट) उंचावर असल्याने इथले वातावरण नेहमीच सदाबहार असते. अशा या निसर्गरम्य ठिकाणी ‘ऑरिटेल तळेगाव’ हे भव्य पंचतारांकित रिसॉर्ट साकारले आहे. अनेक शाही लग्नसोहळे येथे पार पडले असून, कॉर्पोरेट मेजवान्या आणि समारंभ यासाठीही हे सर्वांच्या पसंतीचे ठिकाण आहे.  

 अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या या रिसॉर्टमध्ये अल्पकालीन, तसेच दीर्घकालीन वास्तव्यासाठीही स्टुडिओ, ड्युप्लेक्स रूमच्या सुविधा उपलब्ध आहेत. प्रत्येक रूममधून बगीचा, जलतरण तलाव आणि डोंगरांचा निसर्गरम्य देखावा दिसतो. जिभेची चव भागवणारे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ येथे उपलब्ध आहेत. स्पा, आयुर्वेदिक उपचार, योग पॅकेज यांसह कॉफी शॉप, संगीत व लाइव्ह कार्यक्रमांसह अत्याधुनिक असे बार, जागतिक दर्जाचे खाद्यपदार्थ देणारे रेस्टॉरंट अशा सर्व सुविधा उपलब्ध आहेत. स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही प्रकारच्या पर्यटकांसाठी ही रिसॉर्ट आदर्शवत आहे. वाइनतज्ज्ञ समीर राऊत यांच्या मार्गदर्शनासह येथे स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय वाइनचा अनुभव घेता येतो. हॉट एअर बलूनमध्ये बसण्याची सुविधाही येथे उपलब्ध आहे. येथून बेडसे गुंफा, पवना धरण अगदी जवळ आहे. 

घोडेस्वारीपासून घोड्यांची निगा, प्रशिक्षण, पशुवैद्यकीय सेवासल्ल्यांसह घोड्यांच्या खेळांसंबंधीच्या व्यवस्थापनातील सल्ले या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी उपलब्ध असणारे देशातील एकमेव केंद्र असलेले ‘जपालोप इक्वेस्ट्रियन सेंटर’ हे सर्वांत मोठे आकर्षणही येथून जवळच आहे. 

हे रिसॉर्ट ऑरिटेल हॉटेल ग्रुपचे असून, त्यांची अंधेरी पूर्व आणि पश्चिम, हिंजवडी आणि गोव्यातील अंजुना येथेही रिसॉर्टस्  आहेत. 
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language