Ad will apear here
Next
‘कुटूर’ प्रदर्शनाचे पुण्यात आयोजन
पुणे : जगभरातील प्रसिद्ध डिझायनर ज्वेलरी, कपडे आणि अॅक्सेसरीज पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. निमित्त आहे पुण्यातील स्मिता पटवर्धन आणि नैना मुथा यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या ‘कुटूर’ या खास प्रदर्शनाचे. शुक्रवार, २३ ऑगस्ट व शनिवार, २४ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी ११ ते रात्री नऊ या वेळेत  कोरेगाव पार्क येथील हॉटेल वेस्टीन येथे हे प्रदर्शन होणार आहे. ते सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.

शुक्रवारी, २३ ऑगस्ट रोजी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि ग्रॅव्हिटस फाउंडेशनच्या प्रमुख उषा काकडे यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाला सुरुवात होणार आहे.
 
नैना मुथा व स्मिता पटवर्धन
या प्रदर्शनाबद्दल अधिक माहिती देताना स्मिता पटवर्धन म्हणाल्या, ‘दागिने, कपडे आणि अर्थात अक्सेसरीज या महिला वर्गाला आकर्षित करणाऱ्या गोष्टी. जगभरातील प्रसिद्ध डिझायनर्सने बनविलेल्या या गोष्टी खरेदीचा आनंद काही औरच असतो. हीच संधी ‘कुटूर’ या प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही पुणेकरांना उपलब्ध करून देत आहोत. या प्रदर्शनात ११० पेक्षा जास्त स्टॉल्सवर कपडे, दागिने, होमवेअर, गिफ्टिंग यांबरोबरच अॅक्सेसरीजची खरेदी करता येणार आहे. विशेष म्हणजे डिझायनर तरीही खिशाला परवडणाऱ्या अशा गोष्टी या ठिकाणी खरेदी करता येतील. महिला उद्योजकांना प्रोत्साहन देणे, हा या प्रदर्शनामागील मुख्य उद्देश आहे.’     
                                              
‘या प्रदर्शनाच्या माध्यमातून दर वर्षी विविध सामाजिक संस्थांना मदत करण्यात येते. यंदा इंडियन आर्मीज वूमेन्स विंग (एडब्लूडब्लूए) यांना मदत करण्यात येणार आहे,’ असेही त्यांनी नमूद केले.   
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language