Ad will apear here
Next
‘स्वेरी’मध्ये शिक्षक दिन साजरा


सोलापूर :
‘शिक्षक ही अशी व्यक्ती आहे, जी विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी सतत त्याग करत असते,’ असे प्रतिपादन अॅटलास कोपको इंडिया लिमिटेडचे कॉर्पोरेट मनुष्यबळ व्यवस्थापक कबीर गायकवाड यांनी शिक्षक दिनी केले. गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटतर्फे संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मध्यवर्ती असलेल्या अॅम्पिथिएटरमध्ये भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या १३१व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. सागर कवडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 

या वेळी गायकवाड म्हणाले, ‘पालक तुम्हाला नाव देतात; पण शिक्षक तुम्हाला ज्ञानदानातून तुमची स्वतःची ओळख निर्माण करून देतात. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण वेगवेगळ्या परीक्षांना सामोरे जात असतो. हिऱ्याला त्याची ओळख निर्माण करून देण्यासाठी प्रकाशाची गरज असते, त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना शिक्षकरूपी प्रकाशाची अत्यंत आवश्यकता असते. महाभारतामध्ये जसे अर्जुनाने श्रीकृष्णाठायी स्वतःला समर्पित केले, तसे तुम्ही शिक्षकांठायी समर्पित व्हावे. यासाठी तुमच्या इच्छांचे रूपांतर त्यागात करा.’ डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेच्या पूजनानंतर अभियांत्रिकी आणि फार्मसीच्या अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी शिक्षकदिनाचे महत्त्व सांगितले. ‘स्वेरी’चे माजी विद्यार्थी व टॉपर्स अकॅडमीचे प्रा. गणेश धांडोरे, प्रा. संकेत पवार, ‘स्वेरी’चे संस्थापक सचिव आणि अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी. पी रोंगे यांनी ‘शिक्षक कसा असावा आणि त्यांचे योगदान काय आहे’ हे सांगितले. अध्यक्षीय भाषणातून पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. सागर कवडे म्हणाले, ‘प्रत्येक वळणावर शिक्षकांचा आदर केला पाहिजे. तुमच्यातील क्षमता ओळखतो आणि त्या योग्य क्षमतेला वाव देतो तोच खरा शिक्षक. असे शिक्षक आपल्याला ओळखता आले पाहिजेत.’ 

डॉ. कवडे यांनी आपल्या प्रशिक्षण काळात गडचिरोलीमध्ये आलेला अनुभव सांगितला. ‘संकटाचा सामना करण्यासाठी निधड्या छातीने पुढे गेले पाहिजे,’ असे ते म्हणाले. शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइनच्या उतारवयातील एक घटना सांगून ‘आयुष्यभर विद्यार्थी होऊन ज्ञान घ्यावे,’ असे आवाहन त्यांनी केले. 

शिक्षक दिनाचे औचित्य साधून ‘स्वेरी’अंतर्गत असलेल्या चारही महाविद्यालयांचे प्राचार्य, पीएचडी प्राप्त करणारे प्राध्यापक, तसेच उत्कृष्ट शोधनिबंधासाठी निवड झालेल्या प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये ‘स्वेरी’चे विश्वस्त प्रा. सूरज रोंगे, डॉ. प्रशांत पवार, डॉ. ए. एस. विभुते, डॉ. श्रीदेवी, डॉ. रणजित गिड्डे, डॉ. मीनाक्षी पवार, डॉ. संताजी पवार, डॉ. एम. एम. आवताडे, डॉ. संदीप वांगीकर, डॉ. व्ही. एस. क्षीरसागर, डॉ. मिथुन मणियार, डॉ. दीप्ती तंबोळी, प्रा. संजीवनी कदम, प्रा. एच. एम. तांबोळी, प्रा. एस. एम. पाटील, प्रा. महेश मठपती, डॉ. बी. सी. मिलीमठ, डॉ. भुवनेश्वरी, प्रा. संदीपराज साळुंखे, प्रा. एच. एस. पवार, प्रा. यशपाल खेडकर, प्रा. प्राजक्ता खुळे, प्रा. वृणाल मोरे या प्राध्यापकांचा व रजिस्ट्रार राजेंद्र झरकर यांचा समावेश आहे. 

‘स्वेरी’च्या ‘सुजनरंग’ या वार्षिक नियतकालिकाच्या पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात तृतीय क्रमांक आल्यामुळे ‘सुजनरंग’च्या संपादकीय विभागाचादेखील या वेळी सत्कार करण्यात आला. या वेळी विश्वस्त प्रा. सूरज रोंगे, ‘स्वेरी’अंतर्गत असलेल्या महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

सूत्रसंचालन प्रा. यशपाल खेडकर यांनी केले, तर ‘स्वेरी’चे ज्येष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language