Ad will apear here
Next
आशा भोसले, स्वप्नील जोशी, ना. धों. महानोरांना पुरस्कार प्रदान
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३२व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजन

सोलापूर : गुरुपौर्णिमा व अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३२व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या पुरस्कार सोहळ्यात गायिका आशा भोसले यांना ‘स्वामीरत्न’ हा राष्ट्रीय, तर जेष्ठ कवी ना. धों. महानोर आणि अभिनेता स्वप्नील जोशी यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यगुप्तचर वार्ताचे अप्पर महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी हे होते.

हा पुरस्कार पद्मश्री पं. हृदयनाथ मंगेशकर, अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले, प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरुप रोख रक्कम ५ लाख, मानपत्र व सन्मानचिन्ह तर स्वामीभूषण राज्य पुरस्कार २०१९ मराठी सिनेअभिनेता स्वप्नील जोशी आणि ज्येष्ठ कवी व गीतकार ना. धों. महानोर यांना प्रत्येकी एक लाख २५ हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आला. 

या प्रसंगी व्यासपीठावर अलका भोसले, अर्पिता भोसले, अनिता खोबरे, अनुषा अय्यर, आरती लिंगायत, कृषीभूषण विश्वासराव कचरे, अण्णा थोरात, बाळासाहेब धाबेकर, महेश इंगळे, संतपराव शिंदे, अभय खोबरे, शामराव मोरे, अभय दिवाणजी, चंद्रकांत कापसे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी जिल्हास्तर पुरस्कार निवड समिती प्रमुख अभय दिवाणजी यांनी निवडीमागची आपली भूमिका विषद केली. 

या वेळी बोलताना गायिका आशा भोसले म्हणाल्या, ‘फक्त तुम्हीच त्रास सहन केलात, असे नाही, तर मीही खूप त्रास सहन केला आहे. कष्टातून मी वर आले आहे. त्याचे सार्थक झाले आणि तुमची इच्छा असेल, तर आणखी दहा वर्षे मी चालेन पण आशा असेल, तरच माणूस जगू शकतो.’ 

‘मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश’ हे गीत सादर करून त्या म्हणाल्या, ‘आई-वडिलांनी माझे नाव आशा ठेवले, हे नाव आशावादी राहता येईल असे आहे. आजचा दिवस हा आपला आहे असे समजून तो आनंदाने घालवावा. महिलांनी वयाचा विचार न करता नेहमी तरुण राहावे. सकाळी मस्त फ्रेश होऊन दिवसाला सुरवात करावी आणि चांगले जीवन जगावे.’ 


‘माझी आई कवी ना. धों. महानोर यांच्या गावाकडची आहे. आई संध्याकाळी आमच्याकडून गाणी म्हणवून घ्यायची. आई म्हणायची तुम्ही सुंदर आहात. त्यातून तिने आमच्यात आत्मविश्वास निर्माण केला. आमचे सर्वांचे शिक्षण कमी झाले; पण गाण्याची कला अंगी बाणली त्यातून आम्ही उत्कर्ष साधला. शब्द जसे असतात तसे सूर असतात. शब्द गाण्यासाठी की गाण्यासाठी शब्द निर्माण झालेत हे कळायला हवे. गाण्याला चाल कसे असावे हे कळायला पाहिजे. हृदयनाथ याची गाणी अवघड असतात ते समजून घेणे आवश्यक आहे. मी कधी कधी जेवत नाही; पण रियाज मात्र दररोज करते. मला त्यासाठी कधी घरी त्रास होत नाही. मी जिमला जाते आणि डाएटिंग ही दररोज करते. अक्कलकोटला स्वामींच्या दारी मिळालेला हा मानसन्मान म्हणजे स्वामींचा प्रसाद असल्याचे मी मानते,’ असे आशा भोसले यांनी नमूद केले.

या वेळी अन्नछत्र मंडळास आयएसओ मानांकन ९००१:२०१५ व आयएसओ २२००० : २००५ हे प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते जन्मेजयराजे भोसले व अमोलराजे भोसले यांना या सोहळ्याप्रसंगी प्रदान करण्यात आले. 

या वेळी संजय राऊळ, लाला राठोड, राजशेखर लिंबीतोटे, अशोक किणीकर, लक्ष्मण पाटील, संतोष भोसले, संदीप फुगे-पाटील, डॉ. हरीश अफझलपूर, अ‍ॅड. नितीन हबीब, पोलीस निरीक्षक कलप्पा पुजारी, पोलीस निरीक्षक विजय जाधव, दिलीप सिद्धे, डॉ. अंधारे, डॉ. दामा, प्रा. भीमराव साठे, शिरीष मावळे, प्रवीण देशमुख, राजू नवले, संजय गोंडाळ, गणेश भोसले, शीतल फुटाणे, मनोज निकम, सनी सोनटक्के, गोविंदराव शिंदे, प्रसाद हुल्ले, दत्ता माने, प्रशांत शिंदे, शरद भोसले, राजेंद्र पवार, महांतेश स्वामी मंडळाचे सेवेकरी, कर्मचारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक व सूत्रसंचालक सुधीर गाडगीळ आणि निवेदिका श्वेता हुल्ले यांनी केले. 
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language