Ad will apear here
Next
किलीमांजारो शिखरावर फडकला ११५ फूट लांब तिरंगा
आफ्रिकेतील सर्वोच्च शिखरावर ‘गिरिप्रेमी’च्या गिर्यारोहकांची यशस्वी चढाई

पुणे : आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर माउंट किलीमांजारोवर (उंची ५८९५ मीटर) ‘गिरिप्रेमी’च्या नऊ गिर्यारोहकांनी नुकताच तब्बल ११५ फूट लांबीचा भारतीय तिरंगा ध्वज फडकवला. 

पुण्यातील तेजा पळसोदकर, प्रत्युष पांडे, प्रसाद पांडे, दीपा पांडे, वरुण मेहता, साहिल बांदल, मनीष परीख, कुमार अजवानी व सर्वेश कुलकर्णी यांनी ‘गिरिप्रेमी’चे एव्हरेस्ट व कांचनजुंगा शिखरवीर कृष्णा ढोकले यांच्या नेतृत्वाखाली १५ सप्टेंबर २०१९ रोजी ही यशस्वी चढाई केली. या सर्व गिर्यारोहकांनी एकाच वेळी ११५ फुट लांब भारतीय तिरंगा ध्वज किलीमांजारो शिखरावर फडकाविला. 

‘माउंट किलीमांजारो’ हे आफ्रिका खंडातील सर्वात उंच शिखर असून, जगभरातील गिर्यारोहकांमध्ये प्रसिद्ध आहे. टांझानियातील किलीमांजारो अभयारण्य परिसरातून ट्रेक करत या शिखरावर चढावे लागते. हे शिखर हे एका सुप्त ज्वालामुखीचा भाग असून, गेल्या १० हजार वर्षांहून अधिक काळ या ज्वालामुखीचा उद्रेक झालेला नाही. म्हणूनच या शिखराची रचना ज्वालामुखीसारखी दिसते. या अजब संरचनेमुळेदेखील ‘माउंट किलीमांजारो’ प्रसिद्ध आहे.

ही यशस्वी कामगिरी करणारे सर्व नऊ गिर्यारोहक गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनिअरिंगचे विद्यार्थी आहेत. संस्थेच्या वरिष्ठ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या सर्वांनी मोहिमेची तयारी केली होती. हाफकिन जीवऔषध महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राजेश देशमुख यांच्या हस्ते या मोहिमेचा ध्वजप्रदान कार्यक्रम करण्यात आला होता.  
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi