Ad will apear here
Next
ठाणे जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयात मीडिया वॉर रूम
इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियावर प्रशासनाचे लक्ष


ठाणे :
विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याच्या पार्श्वभूमीवर पेड न्यूज, एकतर्फी बातम्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठाणे जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयात मीडिया वॉर रूमची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १८ विधानसभा क्षेत्रांवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करणारी यंत्रणा कार्यान्वयित करण्यात आली आहे. 

राज्यात २१ ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार आहे. त्यासाठी शासनाकडून सर्व प्रकारची तयारी केली जात आहे. निवडणुकीच्या काळात जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघावर लक्ष ठेवता यावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मीडिया वॉर रूम तयार करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघ ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्यात आले आहेत. 

जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयात तयार करण्यात आलेल्या मीडिया वॉर रूममधील यंत्रणा सर्व मतदारसंघांशी जोडली जाणार आहे. त्यावर अधिकारी-कर्मचाऱ्यांची नजर असणार आहे.

जिल्ह्यातून प्रसिद्ध होणारी सर्व वर्तमानपत्रे, पुरवण्या या रूममध्ये आणून त्यांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांची तपासणी केली जाणार आहे. पेड न्यूजचा प्रकार आढळला, तर त्या बातमीचा खुलासा संबंधित वर्तमानपत्राकडून त्वरित मागितला जाणार आहे. त्यावर समाधान झाले नाही, तर संबंधितांवर पुढील कारवाई केली जाणार आहे. 

इलेक्ट्रॉनिक माध्यमांवरही लक्ष असणार आहे. त्यांनीही एकतर्फी वृत्त दिल्यास त्याची चौकशी केली जाईल. जिल्ह्यातील सर्व वर्तमानपत्रांच्या कार्यालयांना निवडणुकीच्या काळात प्रसिद्ध होणारी वर्तमानपत्रे पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

‘सध्या जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयात लहान-मोठी अशी १००हून अधिक वर्तमानपत्रे येत आहेत. रोजच्या वर्तमानपत्राच्या फाइल बनविण्यात येत असून, बातम्यांसोबतच जाहिरातींवरही नजर असणार आहे. एकतर्फी बातमी येऊ नये यासाठी प्रयत्नशील राहू,’ असे ठाण्याच्या जिल्हा माहिती अधिकारी मनीषा राव यांनी म्हटले आहे. 
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi