Ad will apear here
Next
संघर्ष ते राष्ट्रमंदिर निर्माण (लेखमाला प्रस्तावना)


अयोध्येमध्ये भव्य श्रीराम मंदिराची उभारणी लवकरच केली जाणार आहे. त्यासाठी संपूर्ण समाजाच्या सहभागाचे प्रतीक म्हणून देणगी स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. केवळ ‘हिंदूंचे एक मंदिर’ असा विचार न करता समग्र देशबांधवांचे एक ‘राष्ट्रमंदिर’ असा व्यापक दृष्टिकोन ठेवून याची निर्मिती केली जाणार आहे.

राममंदिराच्या निर्मितीचा हा प्रवास सोपा नव्हताच. वर्षानुवर्षे चाललेला राममंदिर-बाबरी मशिदीचा वाद संपूर्ण जगाचे लक्ष वेधत होता. भारताच्या नि:पक्षपाती न्याययंत्रणेचा निर्णय बघायला संपूर्ण जग स्तब्ध होते. हिंदू बहुसंख्याक असणाऱ्या भारतात हिंदूंनाच एक मंदिर बांधायला इतका संघर्ष करावा लागतोय, ह्याचे आश्चर्य जगात होते; पण हाच भारताच्या खऱ्या लोकशाहीचा विजय आहे. इथे बहुसंख्याक म्हणून मनमानीचा कारभार केला जात नाही. न्याय्य मार्गानेच निर्णय घेतला जातो. हे जगाला ह्यात पटलेले आहे.

रामजन्मभूमीचा मुक्ती संघर्ष हा मोठा इतिहास आहे. आधुनिक भारतातील महत्त्वाच्या घटनांपैकी एक आहे. या संघर्षाचा आढावा घेणे आवश्यक आहे. रामजन्मभूमीचा इतिहास, राष्ट्रमंदिराचा शिलान्यास, रथयात्रा, बाबरीढाचा पाडला जाणे हे सगळे महत्त्वाचे टप्पे आहेत. देशातील धार्मिकवाद, सुन्नी सेन्ट्रल बोर्ड ऑफ वक्फची भूमिका, शिया वक्फ बोर्डाची भूमिका, निर्मोही आखाड्याचा युक्तिवाद, पुरातत्त्व सर्वेक्षण आणि न्यायालयीन पातळीवर हा खटला कसा जिंकला हेसुद्धा समाजाला स्पष्टपणे सांगण्याची ही वेळ आहे. रामलल्ला ह्यांनी खटला जिंकला आणि आता मंदिर उभारणीची वेळ आलेली आहे. 

ह्या सगळ्या घडामोडींवर प्रकाश टाकणारी लेखमाला आजपासून प्रसिद्ध करत आहोत. धर्मनिरपेक्ष असणाऱ्या जगातल्या ह्या सगळ्यात मोठ्या संसदीय लोकशाहीने कायद्याच्या आधारे घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय जनतेनेही किती संयमाने स्वीकारला आहे, हेसुद्धा जगाने पाहिलेले आहे. आता प्रत्यक्ष मंदिर-निर्माणाच्या निमित्ताने ही लेखमाला नक्कीच उपयुक्त ठरेल! या लेखमालेतील एक लेख दररोज bytesofindia.com वर प्रसिद्ध होईल.

- डॉ. गिरीश आफळे, पुणे (निगडी, प्राधिकरण)
........
डॉ. गिरीश आफळेलेखक डॉ. गिरीश आफळे यांचा संक्षिप्त परिचय

शिक्षण : एम. डी. (डरमॅटॉलॉजी); १९८९ या वर्षी पुणे विद्यापीठातून एलएलबीही उत्तीर्ण.

व्यवसाय/कार्य : चिंचवड येथील मोरया हॉस्पिटलमध्ये गेली ३० वर्षे त्वचारोग, गुप्तरोग, कुष्ठरोग या विषयांत कन्सल्टंट व सध्या हॉस्पिटलचे अध्यक्ष. वरील ठिकाणच्या व कर्जत या वनवासी भागातील कार्यानुभवावर आधारित ‘चक्रव्यूह’ हा कथासंग्रह प्रसिद्ध. वृत्तपत्रे, नियतकालिके, आकाशवाणी या माध्यमातून कुष्ठसमस्येवर जनजागरणाचे कार्य केले. गेली २१ वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिंपरी-चिंचवडचे संघचालक.

डॉ. आफळे यांची प्रकाशित झालेली पुस्तके
- अयोध्या आंदोलनावर आधारित ‘बखर अयोध्येची’ हा ग्रंथ
- वंगभंग आंदोलन – एक अभ्यास 
- स्मृती पारिजात (द्वितीय प. पू. सरसंघचालक गोळवलकर गुरुजींच्या प्रेरक आठवणी) 
- स्वामी विवेकानंद व संघ प्रार्थना 
- रा. स्व. संघ प्रश्नोत्तरे - FAQ 
- श्रीराम मंदिर ते राष्ट्र मंदिर
- सांस्कृतिक वार्तापत्र प्रकाशित ‘महिमा श्रीरामांचा’ या विशेष अंकाचे अतिथी संपादक
- कार्यकर्ता हितोपदेश
................

‘बखर अयोध्येची’ या पुस्तकासाठी, तसेच या लेखमालेसाठी वापरलेले संदर्भग्रंथ 

- आदित्य स्वरूप, सत्य दर्पण में अयोध्या, प्रकाषक- श्रीमती मधु जौहरी, १९९३
- श्रीराम जन्मभूमि मंदिर के पक्ष में साक्ष्य, विहिंप.
- कालिदास, रघुवंश, सर्ग १३
- के. आर. मलकानी (अनुवाद - अशोक पाध्ये, सिंधची दर्दभरी कहाणी, चिनार पब्लिशर्स, २०००)
- रणजित देसाई, श्रीमान योगी, १९६८
- राम कुमार भ्रमर, अयोध्य का पथिक, राधाकृष्ण प्रकाशन, नई दिल्ली, १९९३
- जस्टिस देवकीनंदन अगरवाल, श्रीराम जन्म भूमि-ऐतिहासिक एवं विधिक समीक्षा, प्रकाशक-श्रीराम जन्म भूमि मुक्ति यज्ञ समिति, भारत भवन लखनऊ
- वि. ग. कानिटकर, शुभदा गोगटे, अयोध्या आणि हिंदू समाजापुढील प्रश्न. मूळ पुस्तक Ayodhya and After : Issues before Hindu Society by Koentald Elst, मराठी अनुवाद, शुभदा सारस्वत प्रकाशन, १९९४
- श्रीराम जन्मभूमी-मुक्ति-यज्ञ : अतीत की आहुतियाँ - वर्तमान के संकल्प, विश्व हिंदू परिषद, उ. प्र. प्रकाशन
- चिरंतन सोमनाथ, भारतीय विचार साधना, पुणे
- रघुनंदन प्रसाद शर्मा, तिथियाँ जो इतिहास बन गईं : श्रीराम जन्मभूमि मुक्ति संघर्ष, प्रकाशक- संकट मोचन आश्रम (श्री हनुमान मंदिर), सैक्टर ६, रामकृष्णपुरम, नई दिल्ली, ११० ००२
- हो. वे. शेषाद्री (अनुवाद - सुधीर जोगळेकर, उगवे संघ-पहाट, भारतीय विचार साधना, पुणे)
- चं. प. भिशीकर, हाक अयोध्येची
- ‘सांस्कृतिक वार्तापत्र’ या नियतकालिकाचे शेकडो अंक 
- BJP's White Paper on Ayodhya 
- तत्कालीन वृत्तपत्रांचे शेकडो अंक
- संग्राम गाथा, सा. विवेक विशेषांक, १९९०
- भानुप्रताप शुक्ल , राम जन्मभूमि का शब्द सत्य, कल्पतरु प्रकाशन, दिल्ली.
- हिंदू बोध या नियतकालिकाचे अनेक अंक

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CUUZCU
Similar Posts
न्यायालयीन संघर्ष (श्रीराम मंदिर लेखमाला - ६) रामजन्मभूमीच्या इतिहासावर प्रकाश टाकणारी लेखमाला - भाग सहा...
मंदिर वही बनायेंगे... (श्रीराम मंदिर लेखमाला - ४) रामजन्मभूमीच्या इतिहासावर प्रकाश टाकणारी लेखमाला - भाग चार...
घुमटावर भगवा फडकला (श्रीराम मंदिर लेखमाला - ३) रामजन्मभूमीच्या इतिहासावर प्रकाश टाकणारी लेखमाला - भाग तीन
तो स्वर्णिम दिवस! (श्रीराम मंदिर लेखमाला - ७) रामजन्मभूमीच्या इतिहासावर प्रकाश टाकणारी लेखमाला - भाग सात

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language