Ad will apear here
Next
‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’
पुणे : ‘संशोधन क्षेत्रात पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण अतिशय कमी आहे. यामुळे आता होणारे संशोधन हे शास्त्रीयदृष्टया योग्य असले, तरी ते एकांगी पद्धतीचे आहे. विविध प्रकारच्या संशोधनांमध्ये महिलांचा सहभाग वाढला तर संशोधनाचे स्वरूप बदलेल,’ असे मत जीवशास्त्र विषयातील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च’च्या (आयसर) शास्त्रज्ञ डॉ. विनिता बाळ यांनी व्यक्त केले. बायकी दृष्टिकोनातून जीवशास्त्राचे आकलन गरजेचे असल्याचेही डॉ. बाळ यांनी नमूद केले.

मराठी विज्ञान परिषद, आयसर आणि गरवारे महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वैज्ञानिक गप्पा कार्यक्रमात डॉ. बाळ ‘जीवशास्त्र : एक बायकी दृष्टिकोन’ या विषयावर बोलत होत्या. या वेळी ‘आयसर’च्या डॉ. अपूर्वा बर्वे, मराठी विज्ञान परिषदेचे कार्याध्यक्ष यशवंत घारपुरे, सचिव नीता शहा, सहसचिव संजय मालती कमलाकर, विनय र. र., डॉ. विद्याधर बोरकर आदी उपस्थित होते.

डॉ. बाळ म्हणाल्या, ‘गेल्या काही वर्षांतील आकडेवारी पाहिली, तर उच्च शिक्षणामध्ये मुलींची टक्केवारी जास्त आहे; मात्र संशोधन किंवा एखाद्या संस्थेत उच्चपातळीवर काम करणाऱ्या महिलांचे प्रमाण तुलनेने अतिशय कमी आहे. दुय्यम असणाऱ्या गोष्टी महिलांना अधिक प्रमाणात कराव्या लागतात. संशोधन क्षेत्रात स्त्रियांचे प्रमाण कमी असल्याने जीवशास्त्रीय संशोधनाकडे सहसा एकांगी दृष्टिकोनातून पाहिले जाते. बहुतांश वेळा पुरुषांना सोयीस्कर ठरेल, असाच निष्कर्ष यामधून काढला जातो. हे चित्र बदलण्यासाठी अधिकाधिक स्त्रियांनी संशोधन क्षेत्रात सहभाग घेणे आवश्याक आहे.’

प्रा. यशवंत घारपुरे म्हणाले, ‘समाजामध्ये विज्ञान रुजविण्यासाठी मराठी विज्ञान परिषद सातत्याने विज्ञानविषयक व्याख्याने, उपक्रम आयोजित करीत असते. मराठी भाषा आणि विज्ञान याचा मेळ घालून दोन्ही गोष्टी समृद्ध करण्याचे कार्य केले जात आहे. तज्ज्ञांची व्याख्याने, वैज्ञानिक वर्षासहल, विज्ञानविषयक पुस्तकांचे प्रकाशन, विज्ञान रंजनस्पर्धा असे विविध उपक्रम परिषदेतर्फे घेतले जातात.’

कार्यक्रमात डॉ. अपूर्वा बर्वे यांनी सूत्रसंचालन केले, तर शहा यांनी आभार मानले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZJKBE
Similar Posts
‘सायन्स गप्पा’मध्ये डॉ. विनिता बाळ पुणे : मराठी विज्ञान परिषद व ‘आयसर’तर्फे ‘सायन्स गप्पा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विज्ञानप्रेमींना आयसर येथील शास्त्रज्ञ डॉ. विनिता बाळ यांच्याशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे. ‘जीवविज्ञान–एक बायकी दृष्टिकोन’ या विषयावर हा गप्पांचा कार्यक्रम रंगणार आहे.  पुण्यातील
विज्ञानप्रेमींनी अनुभवली समुद्रातील सफर पुणे : लाटा कशा निर्माण होतात, समुद्रतळाशी नेमके काय असते, तेथे जीवसृष्टी आणि ऑक्सिजन असतो का, समुद्ररचना कशी बदलत गेली, मॉन्सूनवर समुद्रातील हालचालींचा कसा प्रभाव पडतो, पॅसिफिक, हिंद आणि अटलांटिक महासागराची निर्मिती कशी झाली अशा अनेक प्रश्नांची उकल समजावून घेत विज्ञानप्रेमींनी समुद्रातील सफर अनुभवली
‘सायन्स गप्पा’ कार्यक्रमात ‘ओशियनोग्राफी’वर चर्चा मराठी विज्ञान परिषदेचा पुणे विभाग, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक अँड एज्युकेशनल रिसर्च (आयसर) आणि गरवारे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘सायन्स गप्पा’ या कार्यक्रमात, विज्ञानप्रेमींना आयसर येथील शास्त्रज्ञ डॉ. रजनी पंचांग यांच्याशी संवाद साधता येणार आहे. ११ ऑगस्ट २०१७
‘ज्यू लोकांना समाजकल्याणाचा मोठा वारसा’ पुणे : ‘पुण्यातील ससून हॉस्पिटल, निवारा संस्था, मुंबईतील काळा घोडा, मशीद बंदर, कोकणातील अनेक प्रार्थनास्थळे पाहिल्यानंतर ज्यू समाजाच्या वास्तुरचनेचा वारसा आपल्या लक्षात येतो. एवढेच नव्हे, तर या आणि अशा सामाजिक कार्यात ज्यू लोकांनी दिलेले योगदान आणि मराठी भाषा-संस्कृतीशी असलेली नाळ पाहता त्यांचा समाजकल्याणाचा

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language