Ad will apear here
Next
टेक्निकल अॅनालिसिस आणि कॅन्डलस्टिकचे मार्गदर्शन
आर्थिक बाजारात पैसे कमविण्यासाठी चांगली संधी असते; मात्र अनेक गुंतवणूकदारांना शेअर बाजाराचे अपुरे ज्ञान असल्याने पैसे गमविण्यासाठी वेळ त्यांच्यावर येते. स्वतःची मेहनतीची कमाई अशा प्रकारे घालविण्याऐवजी योग्य ठिकाणी व योग्य प्रकारे गुंतविण्यासाठी रवी पटेल यांनी ‘टेक्निकल अॅनालिसिस आणि कॅन्डलस्टिकचे मार्गदर्शन’मधून शेअर बाजाराची अगदी मुलभूत माहिती देऊन मार्गदर्शन केले आहे.

शेअर बाजारात प्रवेश करताना गुंतवणूकदारांना पडणाऱ्या शेअर कोणते व केव्हा खरेदी करावे, शेअर किती काळ जवळ ठेवावेत व विक्री कधी करावी, या प्रश्नांची उत्तरे यात देण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. आर्थिक बाजार रोकड बाजार, कॅपिटल मार्केट, शेअर मार्केट, बॉम्बे व नॅशनल स्टॉक एक्स्चेंज, इंडेक्स, सेन्सेक्स, निफ्टी या संकल्पना व ‘सेबी’चे कार्य यातून सांगितले आहे.

शेअर बाजारातील पर्याय, अॅनालिसिसचे प्रकार, कॅन्डलस्टिक चार्टिंग, टेक्निकल इंडिकेटर्स, टेक्निकल अॅनालिसिस, त्याच्या केस स्टडी, शेअर बाजाराची महत्त्वाची माहिती कोठून मिळवावी, याबद्दल मार्गदर्शन केले आहे.  

पुस्तक : टेक्निकल अॅनालिसिस आणि कॅन्डलस्टिकचे मार्गदर्शन
लेखक : रवी पटेल
प्रकाशक : बजिंग स्टॉक पब्लिशिंग हाउस
पाने : १९६
किंमत : २५० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZQRBW
Similar Posts
३१ स्टॉक मार्केट ट्रेडिंग टिप्स शेअर बाजारात गुंतवणुकीचे प्रमाण वाढत आहे. यात धोका असला, तरी योग्य अभ्यास आणि सल्ला यामुळे ही गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते; पण अनेक गुंतवणूकदारांना व ट्रेडरना शेअर बाजारात योग्य सल्ला न मिळाल्याने त्यांचे नुकसान होऊ शकते. हे टाळण्यासाठी रवी पटेल यांनी ‘३१ स्टॉक मार्केट ट्रेडिंग टिप्स’मधून टीपा दिल्या आहेत
भारतातील शेअर बाजाराची ओळख छोट्या गुंतवणुकीतून जास्त नफा शेअर बाजारातून मिळतो; पण यात धोकेही अनेक असतात. कधी एकदम उसळी मारणारा हा बाजार कधी नीचांकी पातळीही गाठतो. शेअर बाजाराच्या तोट्यातून वाचण्यासाठी योग्य वेळी योग शेअर खरेदी विक्री करून भरपूर पैसा मिळवण्यासाठी जितेंद्र गाला यांनी ‘भारतातील शेअर बाजाराची ओळख’मधून मार्गदर्शन केले आहे
तुमच्या यशाची गुरुकिल्ली बऱ्याचदा दुसऱ्याच्या अनुभवावरून आपल्याला अनेक गोष्टी शिकता येतात. एन. भट्टाचार्य यांनी या पुस्तकात, तर आपल्यासमोर थॉमस एडिसन, धीरूभाई अंबानी, वॉल्ट डिस्नी अशा थोरांच्या आयुष्यातील प्रसंग, त्यांची वाटचाल, परिश्रम यांविषयी सांगितले आहे.
इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग पैशाची गरज आज पदोपदी भासते. पैशाची आवक मर्यादित असली, तरी त्याचे योग्य नियोजन केले, तर गाठीला पैसा राहतो. यासाठी गुंतवणुकीचे नियोजन व त्यानंतर त्यात वाढ कशी होईल याबाबत अंकित गाला आणि खुशबू गाला यांनी ‘इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग’मधून मार्गदर्शन केले आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language