Ad will apear here
Next
लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’
मुंबई : लोणावळा येथे ५० घोड्यांसोबत पठारी खेड्यांत ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप २०१८’ आयोजित करण्यात आली होती.

२० किलोमीटर (किमी), ४० किमी, आणि ६० किमी या तीन गटांत ही स्पर्धा झाली. महाराष्ट्र घोडा मालक संघटनेतर्फे दरवर्षी ही स्पर्धा भरवण्यात येते. ही स्पर्धा खुल्या वर्गात होत असल्याने घोडा नियंत्रित करणारा कोणीही यात भाग घेऊ शकतो. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत पहिले दोन दिवस घोड्यांची माहिती घेण्यासाठी आणि त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी असतात.

डोंगराळ भागात घेण्यात आलेली २० किमी अंतराची शर्यत अवघ्या एक तासात पार पाडली. यात प्रशिक्षित घोडेस्वारांसह १६ वर्षांखालील मुलेही सहभागी झाली होती. यात त्यांनी उत्तम कामगिरी केली.

‘ही चँपियनशिप येत्या काही वर्षांत अधिकाधिक सहभागींना व पर्यटकांना निश्चितपणे आकर्षित करेल’, असा विश्वास इक्विएस्ट्रियन फेडरेशन ऑफ इंडिया (ईएफआई) चे महासचिव कर्नल आरकेएस वैन यांनी बक्षीस वितरणप्रसंगी व्यक्त केला.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZYKBL
Similar Posts
रसिक मित्र मंडळाच्या व्याख्यानाला प्रतिसाद पुणे : ‘न किसी की आँख का नूर हूँ, न किसी के दिल का करार हूँ, जो किसी के काम न आ सके, मै वो एक मुश्ते-गुबार हूँ अशा वैफल्याच्या ओळी लिहिणारे, मोगल साम्राज्याचा शेवटचे बादशहा ठरलेले बहादूरशहा जफर यांचे जीवन म्हणजे मूर्तिमंत शोकांतिका आहे,’ अशी खंत ज्येष्ठ उर्दू पत्रकार शमीम तारिक यांनी व्यक्त केली.
‘आयएचसीएल’चे महाराष्ट्रात १७वे हॉटेल मुंबई : इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडने (आयएचसीएल) ‘अॅस्पिरेशन २०२२’ या ध्येयपूर्तीच्या दिशेने वाटचाल करत लोणावळ्यातील प्रवेशाची घोषणा केली आहे. कंपनीने काकडे समूहाचा भाग असलेल्या वाइल्ड्स अॅंड वॉटर डेव्हलपर्ससोबत व्यवस्थापन कंत्राटाच्या माध्यमातून ताजचे नवीन हॉटेल सुरू करण्यासाठी करार केला आहे.
‘सरकारने मूलभूत गरजांवर खर्च करावा’ पुणे : ‘मेट्रो आणि मोनोरेल आदी सुविधा देण्यावर कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या सरकारने आरोग्य आणि शिक्षण अशा मूलभूत गरजांवर खर्च करावा,’ अशी अपेक्षा मुंबई येथील केईएम रूग्णालयाचे अधिष्ठता डॉ. अविनाश सुपे यांनी व्यक्त केली. मनोविकास प्रकाशन, जन आरोग्य अभियान आणि पुना सिटीझन–डॉक्टर फोरम यांच्यातर्फे आयोजित
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी शासकीय जमीन देण्यास मंजुरी मुंबई : मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी बालेवाडी (ता. हवेली) येथील पाच हेक्टर ६० आर इतकी शासकीय जमीन देण्यास मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे पुणे मेट्रोच्या कामास गती मिळून शहरातील वाहतूकीची समस्या दूर होणार आहे. यासाठी पुणे शहरातील

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language