
पेशव्यांचे राज्य बुडाले, त्याला शंभर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांनी ‘मराठेशाहीचे शतसावंत्सरिक श्राद्ध’ असे पुस्तक लिहिले, तेच हे पुस्तक. पूर्वरंग आणि उत्तरांग असे पुस्तकांचे दोन भाग आहेत. पूर्वार्धात इंग्रजांपूर्वीचा महाराष्ट्र, इंग्रज हिंदुस्थानात का व कसे आले, या प्रश्नांचा मागोवा घेऊन मराठा राजमंडळ व इंग्रज यांवर चर्चा केली आहे.
उत्तरार्धात विवेचानात्मक भाग अधिक आहे. मराठे व इंग्रज यांचा समकालीन उत्कार्षापकर्ष, मराठेशाही कशाने बुडाली?, मराठेशाहीची राज्यव्यवस्था, मराठ्यांचे पातशाही धोरण, असे विषय हाताळले आहेत. प्रसिद्ध इतिहास संशोधक वासुदेवशास्त्री खरे यांनी उपोद्घात केला आहे. एकूणच मराठ्यांचे सार्वभौम राज्य इंग्रजांनी कसे नष्ट केले व ताब्यात घेतले, याचे सर्वकश चित्र पुस्तकातून समोर येते.
प्रकाशक : वरदा प्रकाशन
पाने : ३१२
किंमत : ३०० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)