Ad will apear here
Next
तिसरी आंतरराष्ट्रीय आयुर्वेद परिषद नेदरलँडमध्ये

पुणे : ‘जागतिक पातळीवर आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसारासाठी नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि नेदरलँड येथील प्रेमदानी आयुर्वेदा यांच्या संयुक्त विद्यमाने तिसऱ्या आंतरराष्ट्रीय आयुर्वेद परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ आणि २६ ऑक्टोबर २०१९ ला ही परिषद डेनहॅगमधील गांधी सेंटर (इंडियन नेदरलँड्सच्या एम्बेसीची सांस्कृतिक शाखा) येथे होणार आहे,’ अशी माहिती संयोजन समितीचे सदस्य डॉ. हरीश पाटणकर यांनी दिली.

‘या परिषदेत आयुर्वेदाच्या जागतिक प्रसार वाढविण्यासाठी कार्यपद्धती, आयुर्वेद उपचार पद्धतीची व्याप्ती, आयुर्वेदासमोरील जागतिक आव्हाने, या क्षेत्रातील सर्वात अलीकडील शोध, आयुर्वेदिक शिक्षण आणि संशोधनाचे आदी विषयांवर चर्चा होणार आहे. विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. दिलीप म्हैसेकर, डॉ. मोहन खामगावकर यांच्या पुढाकारातून ही परिषद होत आहे. ‘केशायुर्वेद’च्या सदस्या डॉ. गायत्री पांडव, किशोर पांडव यांच्यासह वैद्य वैभव मेहता, वैद्य कुणाल कामठे, वैद्य स्नेहल पाटणकर त्यांचे संशोधनात्मक कार्य या परिषदेत मांडणार आहेत. वैद्य रश्मी वेद आयुर्वेदीय सौंदर्य प्रसाधन निर्मिती व त्याचे महत्त्व विशद करतील, तर नागपूरचे डॉ. तपस निखारे, जयपूरचे डॉ शरद पोर्टे, रायपूरचे डॉ. के. बी. श्रीनिवास राव, मुंबईचे डॉ. प्रियांका ठिगळे-रिसबुड शोधनिबंध सादर करणार आहेत. शिक्षण मंत्रालय व दूतावासातील पदाधिकारीही यात सहभागी होणार आहेत. येथे धन्वंतरी पूजनही करण्यात येणार आहे,’ असेही पाटणकर यांनी सांगितले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZVOCF
Similar Posts
वैद्य पाटणकर दांपत्याची आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड पुणे : येथील आरोग्यवर्धिनी चिकित्सालयाचे वैद्य डॉ. हरीश पाटणकर व डॉ. स्नेहल पाटणकर या दाम्पत्याची आठव्या जागतिक आयुर्वेद परिषदेसाठी निवड झाली आहे. अहमदाबाद येथील गुजरात युनिव्हर्सिटी कॉन्व्हेंशन अँड एक्झिबिशन सेंटर येथे होणाऱ्या परिषदेत डॉ. पाटणकर दाम्पत्य ‘केस विकारांच्या निदानासाठी आधुनिक पद्धतीचा उपयोग व वापर’ या विषयावर प्रबंध सादर करणार आहेत
‘संशोधनाने आयुर्वेदावरील लोकांचा विश्वास वाढेल’ पुणे : ‘आयुर्वेद शास्त्राबद्दल लोकांच्या मनात विश्वास आणि अपेक्षा वाढत आहेत. त्यामुळे आयुर्वेदात प्रॅक्टिस करणाऱ्या वैद्यांनी यामध्ये संशोधन करण्यावर भर द्यावा. संशोधन ठरवून होत नाही, तर ते मानसिकतेत असावे लागते. आयुर्वेदाचे अभ्यासपूर्ण सादरीकरण झाले, तर लोक आयुर्वेदाकडे वळतील,’असे प्रतिपादन महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनचे अध्यक्ष डॉ
केशायुर्वेदच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त सत्कार सोहळा पुणे : ‘भारतातील पहिल्या आयुर्वेदीय हेअर टेस्टिंग लॅब अँड रिसर्च सेंटर असलेल्या केशायुर्वेदच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्यवर्धिनी चिकित्सालय व बीव्हीजी इंडिया यांच्या वतीने १०८ सेवाशाखा संकल्पपूर्ती सत्कार व केशायुर्वेद पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. शुक्रवार, १९ जुलै २०१९ रोजी दुपारी तीन
‘आयुर्वेद जागतिक पातळीवर विकसित व्हावा’ पुणे : ‘आयुर्वेद क्षेत्रात बरेच वर्षे काम करत असून, आयुर्वेदाला जागतिक व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत आयुर्वेद पोहचविणे आवश्यक आहे. जागतिक पातळीवर आयुर्वेदाला विकसित करण्यासाठी भारतीय आयुर्वेदाचार्यांचा पुढाकार महत्त्वपूर्ण आहे,’ असे मत नेदरलँड येथील प्रेमदानी आयुर्वेदाचे संचालक डॉ

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language