Ad will apear here
Next
विद्यार्थी विकासासाठी दर वर्षी महिन्याचे वेतन देणाऱ्या स्नेहल गुगळे ठरल्या आदर्श शिक्षिका
स्नेहल गुगळेनंदुरबार : ‘विद्यार्थी माझा पांडुरंग आणि शाळा माझी पंढरी...’ असे मानणाऱ्या शिक्षकांची संख्या आजच्या काळात कमी झाली आहे. अशा मोजक्या शिक्षकांपैकी एक असलेल्या स्नेहल गुगळे यांना यंदाचा राज्य सरकारचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. शिक्षक म्हणून वेगवेगळे उपक्रम त्या राबवतातच; पण २००९मध्ये नंदुरबार जिल्हा परिषदेच्या शाळा कलमाडी त. बो. (ता. शहादा) या शाळेत ‘शिक्षण सेवक’ पदावर रुजू झाल्यापासून आतापर्यंत सलग १० वर्षे त्या दर वर्षी आपले एक महिन्याचे संपूर्ण वेतन स्वेच्छेने आपल्या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी खर्च करतात. पाच सप्टेंबर २०१९ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईत त्यांना हा पुरस्कार प्रदान होणार आहे. 

स्नेहल गुगळे या मूळच्या अहमदनगर जिल्ह्यातील सुसरे (ता. पाथर्डी) येथील. नंदुरबारसारख्या आदिवासीबहुल क्षेत्रात काम करताना आपले विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी त्यांनी लक्षात घेतल्या. त्यांना गरजेनुसार आवश्यक ते साहित्य उपलब्ध करून देऊन गुगळे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात टिकवून ठेवले आणि गुणवंत विद्यार्थी घडविले. आपल्या शाळेतील सर्व १००हून अधिक विद्यार्थ्यांना स्वतःची मुले समजून त्यांच्यासाठी स्वतःच्या वेतनातून बूट-सॉक्स खरेदी करणे, हिवाळ्यात माणुसकीच्या नात्याने सर्व विद्यार्थ्यांसाठी स्वेटर खरेदी करणे, शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत दिवाळी साजरी करून सहकाऱ्यांच्या मदतीने विद्यार्थ्यांना दिवाळी फराळाचे वाटप करणे असे उपक्रम राबविणाऱ्या गुगळे मॅडम यांचे गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्यही तेवढेच भरीव आहे. 

विद्यार्थ्यांना बालवयात फक्त पुस्तकात शिकवलेल्या बाबींपेक्षा त्या सर्व गोष्टी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहण्याची संधी देण्याच्या उद्देशाने अभ्यासक्रमानुसार ‘स्वानुभवावर आधारित प्रत्यक्ष भेटी’ देण्याचा उपक्रम स्नेहल गुगळे यांच्या संकल्पनेतून शहादा तालुक्यातील कलमाडी त. बो. येथील जि. प. शाळेने २०१०पासून राबवायला सुरुवात केली. यात विद्यार्थ्यांना बँकेचे व्यवहार माहिती होण्यासाठी बँक भेट, मेषपालन हा घटक समजण्यासाठी शेतात जाऊन धनगरी जथ्थ्यास भेट, लाकूड कटाई उद्योग समजण्यासाठी वखार भेट, कार्यानुभवांतर्गत कुंभारकामास भेट, आपत्ती व्यवस्थापन समजण्यासाठी अग्निशामक वाहन प्रत्यक्ष शाळेत आणणे असे उपक्रम राबविण्यात आले. बालपणापासून आपल्या विद्यार्थ्यांना अधिक वाचनाची सवय होण्यासाठी शाळेतच बालवाचनालयाची निर्मिती केली. त्यामुळे विद्यार्थ्यांसह गावाचेही शैक्षणिक वातावरण बदलले. 



प्रत्येक बाबतीत आपल्या विद्यार्थ्यांमध्ये नीटनेटकेपणा यावा यासाठी स्वच्छतेचे धडे देताना वेळप्रसंगी शाळेतच विद्यार्थ्यांना आंघोळी घालणे, स्वतः त्यांचे केस कापणे, त्यांची नखे कापणे, टिकली पावडर करणे, यात या शिक्षिकेला कधीही कमीपणा वाटला नाही. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शाळेत ज्ञानरचनावादावर आधारित भरपूर शैक्षणिक साहित्याचीही त्यांनी स्वतः निर्मिती केली आहे. शिवाय शाळेत अत्याधुनिक डिजिटल क्लासरूम तयार करून विद्यार्थ्यांना लोकसहभागातून टॅबलेट उपलब्ध करून देऊन आधुनिक शिक्षणाचे धडेसुद्धा त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना दिले. 

त्यांच्या वर्गातील तीन विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत झळकले आहेत. आपल्या सर्व सहकारी शिक्षकांच्या मदतीने सहा लाख ५३ हजार २४० रुपयांचा निधी लोकसहभागातून मिळवून त्यांनी शाळेत अनेक भौतिक बदल आणि विद्यार्थ्यांची गुणवत्तावाढ घडवून आणली. यामुळे ‘आयएसओ’सारखे महत्त्वपूर्ण मानांकन प्राप्त करणारी नंदुरबार जिल्ह्यातील कलमाडी तर्फ बोरद ही नाशिक विभागातील पहिली शाळा आहे. त्यातही स्नेहल गुगळे यांचे महत्त्वपूर्ण योगदान 

मुलींसाठी शाळेत कराटे प्रशिक्षण, योगासन शिबिरे, बालवयापासून शाळेतच गृहविज्ञानाचे धडे देण्यावर गुगळे यांचा भर राहिला आहे. गावातील महिलांना कन्यारत्न प्राप्त झाल्यावर प्रोत्साहन म्हणून सन्मानपूर्वक त्या महिलांना स्वखर्चाने पैठणी साडी, बाळाला कपडे देणे, असे उपक्रम त्यांनी राबविले. स्त्री-भ्रूणहत्येला आळा घालणारे, तसेच महिला व मुलींचा सन्मान वाढवणारे अनेक उपक्रम जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कलमाडी येथे त्यांनी राबविले आहेत. शैक्षणिक अनुभवांसोबत सर्व सण-उत्सव शाळेत साजरे करून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेचे मूल्य रुजवण्यातही त्या यशस्वी ठरल्या आहेत. 

विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या उपक्रमांबाबत त्यांनी लिहिलेले दोन शोधनिबंध राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचले असून, त्यांचे ३२ शैक्षणिक व वैचारिक लेख विविध मासिके व वृत्तपत्रांत प्रकाशित झाले आहेत. विद्यार्थ्यांसाठी त्यांनी राबविलेले उपक्रम यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत.

४०० किलोमीटर लांब असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातून नंदुरबार जिल्ह्यात नोकरीला आल्यावर या जिल्ह्याचे व विद्यार्थ्यांचे आपण देणे लागतो. या उदात्त भावनेतून काम करणाऱ्या स्नेाहल गुगळे यांच्या महत्त्वपूर्ण शैक्षणिक व सामाजिक योगदानासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाने त्यांच्या दहा वर्षांच्या सेवा काळात त्यांची दखल घेतली आहे. राज्यभरातून निवड झालेल्या सर्व शिक्षकांमध्ये सर्वांत कमी सेवा व सर्वांत कमी वय असणाऱ्या या शिक्षिका आहेत. 

आपल्याला मिळत असलेल्या या सन्मानाचे श्रेय कलमाडी शाळेतील सर्व शिक्षकांच्या टीमवर्कला असल्याचे स्नेहल गुगळे यांनी म्हटले आहे. गावकऱ्यांचे लक्षणीय योगदान, अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसादही महत्त्वाचा असल्याचे त्या सांगतात. प्राथमिक शिक्षक असलेले पती विष्णू एकनाथ वांढेकर यांच्याकडून प्रोत्साहन मिळत असल्याचेही गुगळे यांनी आवर्जून नमूद केले आहे. 

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZZACE
 Hope , she is not the only one . Best wishes .
 Creditable. Very inspiring news. Thanks for sharing
 बाईट्स ऑफ इंडिया मुळे विविध विषयांची आणि उपक्रमांची उत्तम माहिती मिळत असते. मुख्य म्हणजे ही माहिती अत्यंत सकारात्मक असते की ज्यामधून सामाजिक कार्यासाठी प्रेरणा मिळते. "आपल्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन "
 Nice activity
 Nice
 To--
Snehal Gugale madam.
Its come to know by whatsapp messages that you are going to be honoured today.Now perhaps you may be homoured up to this time.i.e.at 20.29 pm.
It is only possible due to honesty & devotional work.In too short period you had got the greater success as ideal teacher at state level.
So salute to your devotional work.
Also best wishes for the National level award.
In the triable area to do this efforts for the students as the materanal relation is the great job done by you.In all this man loses his personal life.
So CONGRATS again.Best.Lage raho.Aage badho.
DCPatel,Talode.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹☝️☝️☝️☝️☝️🙏🐚🐚🐚📢📢📢📢
 कु.स्नेहल गुगळे मॅडमचे खुप खुप अभिनंदन
Similar Posts
सोन्यासारख्या शिक्षकाला सोन्याची अंगठी नंदुरबार : शिक्षक गावाच्या शाळेसाठी आणि गावासाठीही काय करू शकतात आणि त्या कृतज्ञतेपोटी गाव काय करू शकते, हे कल्पनेच्या पलीकडचे असू शकते. नंदुरबारसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यातील कलमाडी तर्फ बोरद (ता. शहादा) येथील ग्रामस्थांनी चांगले काम करणाऱ्या शिक्षकाला कृतज्ञतेपोटी १० ग्रॅम सोन्याची अंगठी भेट म्हणून दिली
विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेचे धडे देण्यासाठी कलसाडी जि. प. शाळेत शिक्षिकेचा पुढाकार नंदुरबार : कलसाडी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरीच्या वर्गात विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे धडे देण्यासाठी शिक्षिका स्नेहल गुगळे यांनी अनोखा उपक्रम राबविला आहे. त्यांनी सर्व मुला-मुलींना वर्गात कायम वापरता येण्यासाठी एक स्वच्छता किट वर्गात ठेवले आहे. त्यात आरसा, कंगवा, तेल, टिकली, पावडर, नेलकटर या गोष्टी उपलब्ध आहेत
ग्रामीण रुग्णालयातील ‘त्या’ डॉक्टरकडून दिवसभरात ४८३ जणांवर उपचार नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव या अतिदुर्गम, आदिवासी भागातील सरकारी रुग्णालयात गेल्या आठवड्यात एक विक्रम झाला. डॉ. संतोष परमार या वैद्यकीय अधिकाऱ्याने वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधींनी ग्रस्त असलेल्या ४८३ रुग्णांवर एका दिवसात उपचार केले. या रुग्णालयातील अन्य सात डॉक्टरांच्या जागा रिक्त असल्याने
सातपुड्याच्या जंगलात आढळले दुर्मीळ पांढरे मोर नंदुरबार : धडगाव तालुक्यातील (जि. नंदुरबार) डोंगर परिसरात दीड हजारांहून अधिक मोर असून, त्यामध्ये शंभरहून अधिक पांढरे मोर असल्याचे तेथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. स्थानिक आदिवासींकडून सुरू असलेल्या वनसंवर्धनामुळे मोरांची संख्या वाढली आहे. हा भाग सातपुड्यातील पाचव्या व सहाव्या पुड्याच्या आसपास आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language