Ad will apear here
Next
युनायटेड वेस्टर्न बँक
कोणतीही बँक अडचणीत येणे आणि बंद पडणे अथवा अन्य बँकेत विलीनीकरण करणे ही बँकिंग व्यवसायाच्या आणि गुंतवणुकदारांच्या दृष्टीने दुःखाची गोष्ट आहे. युनायटेड वेस्टर्न बँकसारखी एक चांगली बँक लयाला जाणे ही नक्कीच दुःखाची बाब आहे. या बँकेचा उदय, उत्कर्ष आणि अस्त अशा तीन टप्प्यांवर अरुण गोडबोले यांनी या पुस्तकात प्रकाश टाकला आहे. गोडबोले यांनी या विषयाकडे परिशीलन आणि प्रबोधन या दृष्टीने पहिले आह.

१९३६ मध्ये या बँकेची स्थापना झाली. त्या वेळी बँकेचे भागभांडवल होते तीन लाख रुपये. पुढे बँकेचा आलेख चढताच राहिला. २००० नंतरचा काळ मात्र बँकेसाठी अस्थिरतेचा होता. बँकेच्या अधोगतीच्या कारणांवर गोडबोले यांनी चर्चा केली आहे. बँकेच्या सात दशकांची ही वाटचाल अन्य बँकांसाठीही वेगवेगळ्या कारणांनी दिशादर्शक आहे.

प्रकाशक : कौशिक प्रकाशन
पाने : २६४
किंमत : २२५ रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZJFBQ
Similar Posts
पगारातून आयकरकपात मार्गदर्शिका (२०१८-२०१९) वर्षानुवर्ष नियमितपणे आयकर भरणाऱ्यांनासुद्धा आयकर कायद्याची संपूर्ण माहिती नसते. ही माहिती इंग्रजीत उपलब्ध असल्यामुळेसुद्धा ती नीट वाचली जात नाही; पण प्रत्येक करदात्याला हे माहित असणे आवश्यक असते. त्या दृष्टीने अरुण गोडबोले यांनी आर्थिक वर्ष २०१८-२०१९साठी हे पुस्तक लेखन केले आहे.
पगारातून आयकरकपात मार्गदर्शिका (२०१७-२०१८) देशाचा अर्थसंकल्प हा सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यावर थेट परिणाम करणारा असतो. त्यामुळे त्याविषयी नीट माहिती करून घेणे आवश्यक असते. विशेषतः आयकरकपात हा विषयक नोकरदार व्यक्तींसाठी जिव्हाळ्याचा असतो. अरुण गोडबोले यांनी या पुस्तकात याच विषयावर मार्गदर्शन केले आहे.
सिनेमाचे दिवस स्वातंत्र्यचळवळीत सहभागी झालेल्या आणि सिनेमा, नाटक वर्ज्य असलेल्या घरात जन्मलेला, वाढलेला मुलगा मोठा झाल्यावर चित्रपट निर्माता म्हणून लौकिक प्राप्त करतो, तेही वयाच्या चाळीशीनंतर. या चित्रपट निर्मात्याच्या, अरुण गोडबोले यांच्या धाडसाची ही कहाणी आहे. कशासाठी, प्रेमासाठी, नशीबवान, बंडलबाज यांसारख्या गाजलेल्या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली आहे
अजरामर ‘गीत रामायण’ ‘मोडू नका वचनास-गाथा मोडू नका वचनास, भरतालागी द्या सिंहासन, रामासी वनवास’ या गदिमांच्या लेखणीतून उतरलेले हे शब्द गायिका कुमुदिनी पेडणेकर यांनी गायिले आहे. ग. दि. माडगूळकर यांचे शब्द, सुधीर फडक्यांची संगीतरचना आणि सीताकांत लाड यांचे संयोजन यातून साकारलेल्या गीत रामायणाने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language