Ad will apear here
Next
पुणे येथे ब्लॉगलेखन कार्यशाळा
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद आणि साहित्य सेतू यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ब्लॉगर बना’ ही लेखन कार्यशाळा आयोजित केली आहे. यात ब्लॉग म्हणजे काय, ब्लॉगलेखन कसे करावे, त्यासाठी आवश्यक तांत्रिक ज्ञान, ब्लॉग निर्मिती प्रक्रिया आणि कमर्शियल ब्लॉगिंग या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.  

ब्लॉगलेखन ही आधुनिक काळातील विलक्षण लेखनकला आणि कौशल्य असून, त्याचे तंत्र समजून घेण्याची आणि ते चिकाटीने आत्मसात करण्याची गरज आहे. ब्लॉगर म्हणून उत्तम करिअर संधी आहे.

या कार्यशाळेत जेष्ठ पत्रकार आणि प्रसिध्द ब्लॉग लेखक भाऊ तोरसेकर हे प्रमुख मार्गदर्शक आहेत; तसेच प्रसिध्द ब्लॉगर व्यंकटेश कल्याणकर, ओंकार दाभाडकर आणि मुकुंद नाडगौडा हेही यात मार्गदर्शन करणार आहेत. ‘या कार्यशाळेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे’, असे आवाहन साहित्य सेतूचे संस्थापक प्रा. क्षितीज पाटुकले यांनी केले आहे.

कार्यशाळेविषयी :
दिवस : १७ डिसेंबर २०१७
स्थळ : पुणे

अधिक माहितीसाठी :
साहित्य सेतू : ७०६६२ ५१२६२, ९५५२८ ५८१००, ९४२०८ ५९८९३   
वेबसाइट : www.sahityasetu.org 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZZNBJ
Similar Posts
‘युवा पिढीने नियमित व्यक्त होणे गरजेचे’ पुणे : ‘मराठी साहित्याला तंत्रज्ञानाच्या सहाय्याने समृद्ध, सजस व अजरामर करण्यासाठी व लोकशाहीला बळकट करण्यासाठी युवा पिढीने नियमितपणे विविध सामाजिक-राजकीय विषयांवर परखडपणे व्यक्त होणे गरजेचे आहे,’ असे मत जेष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी मांडले.
पुण्यात अनुवाद लेखन कार्यशाळेचे आयोजन पुणे : साहित्य सेतू व महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप) यांच्या वतीने ‘अनुवाद कसा करावा?’ ही लेखन कार्यशाळा १६ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५.३० या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. सदाशिव पेठेतील एमईएस ऑप्टिमेट्री कॉलेज येथे ही कार्यशाळा होईल.
‘लेखकाचे भरकटलेपण दूर करण्यासाठी लेखन कार्यशाळा उपयुक्त’ पुणे : ‘लेखन आणि साहित्यनिर्मिती ही एक सृजनात्मक प्रक्रिया आहे. लेखक जोपर्यंत अंतर्बाह्य ढवळून निघत नाही, विविध प्रकारच्या आव्हानांना सामोरे जात नाही, वेगवेगळ्या जाणिवांची, अनुभवांची बेरीज करीत नाही तोपर्यंत सकस साहित्यकृती निर्माण होणार नाहीत. लेखकाचे भरकटलेपण दूर करण्यासाठी लेखनविषयक कार्यशाळा उपयुक्त
‘सुसंगती आणि विसंगतीचा शोध कथा घेते’ पुणे : ‘जिग्सॉ पझल सोडवणे, कथा लिहिणे म्हणजे माणसाच्या आयुष्यातील अनेक शक्यतांचा प्रवास साकार करणे असते. वर्षानुवर्ष आपल्या मनात घर करून बसलेल्या माणसांना घर मिळवून देणे असते. माणसाच्या वागण्यातील सुसंगती आणि विसंगती यांचा शोध घेणे असते,’ असे मत प्रसिद्ध लेखिका मृणालिनी चितळे यांनी व्यक्त केले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language