Ad will apear here
Next
श्रीपाद वल्लभ
श्रीपाद वल्लभांचे हे रसाळ जीवनचरित्र ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी वाचकांसमोर आणले आहे. चौदाव्या शतकात जन्मलेले श्रीपाद वल्लभ आज एकविसाव्या शतकातही प्रिय आहेत, पूजनीय आहेत, ते त्यांच्या अजरामर कार्यामुळे.

विजयनगरचे हिंदू साम्राज्य स्थापन करण्याची मूळ प्रेरणा श्रीपादांची होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही यवनांच्या आक्रमणाला यशस्वीपणे थोपवून हिंदू धर्मरक्षणासाठी हिंदू साम्राज्याची स्थापना करणे, हा मोठा चमत्कारच त्यांनी केला आहे.

या चरित्रात श्रीपादांचा जन्म, मुंज, अनेगुंडीचा महायज्ञ, इस्लामी जन्भासुर अशी स्वतंत्र प्रकरणे आहेत. त्यानंतर माधव हरिहर बुक्क भेटीसह विजयनगरच्या हिंदू साम्राज्याची स्थापना असे टप्पे येतात. माधव म्हणजेच विज्ञारण्यस्वामी. श्रीपादांनी त्यांना शृंगेरी पीठाचे शंकराचार्य केले. श्रीपादांबरोबरच त्यांचेही कर्तृत्व समजते.

प्रकाशक : मृदगंधा प्रकाशन
पाने : १९८
किंमत : २०० रुपये  
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZZQBJ
Similar Posts
कुंडलिनी शक्ती योग, कुंडलिनी व श्वासोच्छ्वास हा त्रिकोण म्हणजे शरीराची प्राणशक्ती आहे. मन एकाग्र केल्यानंतर कालांतराने समाधी अवस्था येते. श्वासोच्छ्वासाची गती मंदावते व त्यातून पुढे कुंडलिनी जागृती सुरू होते. हे त्वरेने शक्य नसले, तरी रोजची बैठक, ध्यान साधना यातून आपल्या शरीरातील कुंडलिनी जागृत करू शकतो.
भावार्थ श्रीगुरुचरित्र आपल्याकडील विविध संप्रदायांत दत्तसंप्रदायाला मोठे महत्त्व आहे. या संप्रदायात श्रीपादवल्लभ, नृसिंहसरस्वती, जनार्दनस्वामी यांसारखे थोर पुरुष होऊन गेले. अध्यात्म व धर्मरक्षणाचे कार्य त्यांनी केले. ही परंपरा पुढे माणिकप्रभू, अक्कलकोटचे स्वामी आणि टेंबे स्वामी महाराज या दत्तभक्तांनी पुढे चालविली या सर्वांनी दत्त महाराजांची उपासना केली
देवमाळ देव आहे की नाही यावर सातत्याने चर्चा होत असते. प्रा. डॉ. पां. ह. कुलकर्णी यांनी ‘देवमाळ’मधून ब्रह्मसूत्रे-वेदांतसूत्रे याचे विश्लेषण करताना देव या संकल्पनेवर प्रकाश टाकला आहे.
विसावा समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनावर आधारित मंजिरी श. धूपकार यांनी लिहिलेली ही चरित्रातील ठळक प्रसंगांसह बारकावेही त्यांनी टिपले आहेत. नारायण ते रामदास ते समर्थ असा हा प्रवास आहे. या प्रवासातील वाटावळणे, ऐतिहासिक घटना, प्रसंग आदींची त्यांनी गुंफण केली आहे. रामदासस्वामींची जडणघडण कशी झाली हे त्यांतून समजते

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language