Ad will apear here
Next
माझ्या मराठी मातीचा...


आज २७ फेब्रुवारी, कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिन. अर्थात मराठी राजभाषा दिन. त्या निमित्ताने पाहू या, ‘माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा’ असं सांगणारी कुसुमाग्रजांची कविता...
..........
माझ्या मराठी मातीचा,
लावा ललाटास टिळा,
हिच्या संगाने जागल्या,
दऱ्याखोऱ्यांतील शिळा.

हिच्या कुशीत जन्मले,
काळे कणखर हात,
ज्यांच्या दुर्दम धीराने,
केली मृत्यूवरी मात.

नाही पसरला कर,
कधी मागायास दान,
स्वर्णसिंहासनापुढे,
कधी लवली ना मान.

हिच्या गगनात घुमे,
आद्य स्वातंत्र्याची द्वाही,
हिच्या पुत्रांच्या बाहूत,
आहे समतेची ग्वाही.

माझ्या मराठी मातीचा,
लावा ललाटास टिळा,
हिच्या संगे जागतील,
मायदेशातील शिळा
- कुसुमाग्रज
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZNSCJ
Similar Posts
कविवर्य कुसुमाग्रजांची ‘विशाखा’ ‘जीवनलहरी’ आणि ‘जाईचा कुंज’ यांनंतरचा ‘विशाखा’ हा कुसुमाग्रजांचा तिसरा काव्यसंग्रह. औचित्य, संयम, विलक्षण जीवन, निसर्ग, राष्ट्र यावरील प्रेम यांतून कुसुमाग्रजांच्या कवितेचा प्रवाह खळखळत, वेगाने वाहत राहतो, याचा प्रत्यय ‘विशाखा’तील कवितांमधून पुन:पुन्हा येतो. आज, २७ फेब्रुवारीला कुसुमाग्रजांच्या जयंतीदिनी मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो
जैसी हरळांमाजी रत्नकिळा... ‘मराठी भाषा म्हणजे जणू कस्तुरी आणि कल्पतरूच,’ असं म्हणणारी फादर ख्रिस्तदास थॉमस स्टीफन्स यांची कविता आज पाहू या...
माझी बोली असे मराठी मराठी बोली अन् भाषा कशी श्रेष्ठ आहे, हे सांगणारी ‘माझी बोली असे मराठी’ ही मा. रा. पोतदार यांची कविता आज पाहू या...
माझा मराठाचि बोलु कौतुकें २७ फेब्रुवारीला मराठी राजभाषा दिन असतो. त्या निमित्ताने आजपासून प्रसिद्ध करत आहोत मराठीचं कौतुक करणाऱ्या काही कविता. या उपक्रमाची सुरुवात संत ज्ञानेश्वरांच्या रचनेपासून...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language