Ad will apear here
Next
नंदुरबारमध्ये राज्यस्तरीय वारकरी संमेलनाला प्रारंभ
अखिल भारतीय वारकरी मंडळातर्फे नंदुरबारमध्ये आयोजित राज्यस्तरीय वारकरी संमेलनाचे उद्घाटन करताना खासदार डॉ. हीना गावीत आणि मान्यवर.

नंदुरबार : अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या जिल्हा कमिटीच्या वतीने शहरातील माळीवाडा परिसरात २१ डिसेंबर २०१८पासून राज्यस्तरीय वारकरी संमेलन, तसेच भव्य कीर्तन महोत्सव व ज्ञानेश्वरी पारायणाला उत्साहात सुरुवात करण्यात आली. संमेलनाचे उद्घाटन खासदार डॉ. हीना गावीत यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प प्रकाश महाराज बोधले, भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, उद्योगपती मनोज रघुवंशी, यशोदा जायखेडकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. विक्रांत मोरे, नगरसेवक आनंदा माळी, भिला खोरी, ह.भ.प. अनिल महाराज वाळवे, ह.भ.प. किशोर महाराज प्रकाशेकर, ह.भ.प. विजय महाराज जाधव, ह.भ.प. छोटू महाराज, डॉ. तुषार सनसे, कृषीभूषण पाटीलभाऊ माळी, नगरसेवक चारुदत्त कळवणकर, गजेंद्र शिंपी, प्रवीण गुरव, विजय माळी आदी उपस्थित होते.

प्रारंभी माळीवाडा परिसरातून ज्ञानेश्वरी पारायण ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली. या वेळी भक्तांनी विविध भक्ती गीते सादर केली. टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि ‘जय हरी विठ्ठल’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता. या वेळी महिला भाविक भक्तांचा फुगड्यांचा खेळ रंगला होता. या राज्यस्तरीय वारकरी संमेलनाचे संयोजन समस्त माळी समाजाने केले आहे. वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज माळी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फकीरा माळी यांनी केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZNDBV
Similar Posts
आदिवासी भागातील कबड्डीपटू चुनीलालची गरुडभरारी नंदुरबार : दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या आदिवासी कुटुंबात जन्मलेल्या चुनीलाल पावराने कबड्डीतील प्रावीण्याच्या बळावर राष्ट्रीय पातळीवरील प्रो कबड्डी लीगमध्ये निवड होण्यापर्यंत मजल मारली आहे. त्याच्या रूपाने देशाला एक प्रतिभावान राष्ट्रीय कबड्डीपटू मिळाला आहे. दुर्गम आदिवासी भागात राहून,अत्यंत प्रतिकूल
ग्रामीण रुग्णालयातील ‘त्या’ डॉक्टरकडून दिवसभरात ४८३ जणांवर उपचार नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव या अतिदुर्गम, आदिवासी भागातील सरकारी रुग्णालयात गेल्या आठवड्यात एक विक्रम झाला. डॉ. संतोष परमार या वैद्यकीय अधिकाऱ्याने वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधींनी ग्रस्त असलेल्या ४८३ रुग्णांवर एका दिवसात उपचार केले. या रुग्णालयातील अन्य सात डॉक्टरांच्या जागा रिक्त असल्याने
मिशन हायस्कूलमध्ये जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिवस साजरा नंदुरबार : येथील एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात नुकताच जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला.
विद्यार्थी विकासासाठी दर वर्षी महिन्याचे वेतन देणाऱ्या स्नेहल गुगळे ठरल्या आदर्श शिक्षिका नंदुरबार : ‘विद्यार्थी माझा पांडुरंग आणि शाळा माझी पंढरी...’ असे मानणाऱ्या शिक्षकांची संख्या आजच्या काळात कमी झाली आहे. अशा मोजक्या शिक्षकांपैकी एक असलेल्या स्नेहल गुगळे यांना यंदाचा राज्य सरकारचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. शिक्षक म्हणून वेगवेगळे उपक्रम त्या राबवतातच; पण २००९मध्ये नंदुरबार जिल्हा परिषदेच्या शाळा कलमाडी त

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language