Ad will apear here
Next
‘उच्च शिक्षणासाठी सामाजिक संस्थांचा हातभार महत्त्वाचा’
कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांचे प्रतिपादन; मुकुल माधव फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांसह कुलगुरु डॉ. के. पी. विश्वनाथा यांच्यासह रितू छाब्रिया व इतर मान्यवर.

पुणे : ‘शेतीविषयक शिक्षणामध्ये नाविन्यपूर्ण बदल केले जात आहेत. सरकारनेही चांगल्या योजना निर्माण केल्या आहेत. शिवाय, आपल्याकडे बहुतांश विद्यार्थी मुख्य व्यवसाय शेती असलेल्या भागातून येतात. मात्र, आर्थिक पाठबळाच्या अभावामुळे त्यांना उच्च शिक्षण घेण्यात अडचणी येतात. अशावेळी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मुकुल माधव फाउंडेशनसारख्या संस्था पुढे येऊन या मुलांच्या शिक्षणासाठी हातभार लावत आहेत, ही सुखावह बाब आहे. विद्यार्थ्यांनीही मिळालेल्या मदतीचा योग्य विनियोग करून पूर्ण क्षमतेने अभ्यास करत आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करावेत,’ असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी विश्वनाथा यांनी केले.

फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशनच्या यांच्या वतीने कृषी विद्यापीठातून शिक्षण घेणाऱ्या एकूण ५९ गरजू विद्यार्थ्यांना ‘मोहिनी प्रल्हाद छाब्रिया शिष्यवृत्ती’ दिली जाणार आहे. त्यापैकी शिवाजीनगर येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी संलग्नित कृषी महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेणाऱ्या १२ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. १२ मुलांच्या शिष्यवृत्तीचा सहा लाखांचा धनादेश फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया यांनी डॉ. विश्वनाथा यांच्याकडे सुपुर्द केला. या वेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. ए. एल. फरांदे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. पी. एन. रसाळ, फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष बी. आर. मेहता, वनाधिकारी डॉ. लक्ष्मण मूर्ती, प्रा. वाय. सी. साळे, फाउंडेशनचे बबलू मोकळे आदी उपस्थित होते. पदवीसाठी ३६, पदव्युत्तर पदवीसाठी २०, तर पीएचडी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना दर वर्षी ही शिष्यवृत्ती मिळणार आहे. पुणे, जळगाव, कोल्हापूर, नंदुरबार, कऱ्हाड, धुळे येथील कृषी महाविद्यालयातील ५९ विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे.

शिष्यवृत्तीचा धनादेश कुलगुरु डॉ. के. पी. विश्वनाथा यांच्याकडे सुपूर्त करताना रितू छाब्रिया

डॉ. के. पी. विश्वनाथा म्हणाले, ‘मुकुल माधव फाउंडेशनने दिलेल्या शिष्यवृत्तीचा लाभ घेत विद्यार्थ्यांनी उत्तम गुणांसह पदवी घ्यावी. त्यापुढील शिक्षण विद्यार्थ्यांनी स्वावलंबनातून केले पाहिजे. त्यासाठी विद्यापीठामार्फत ज्युनिअर रिसर्च फेलो (जेआरएफ), सिनिअर रिसर्च फेलो (एसआरएफ) योजनांचा लाभ घ्यावा. आपल्या शिक्षणाला हातभार लावणाऱ्या दानशूर व्यक्तींकडून आदर्श घेत आपणही पुढील पिढीला हातभार लावण्याची वृत्ती जोपासली पाहिजे.’

रितू छाब्रिया म्हणाल्या, ‘शेतकरी आणि फिनोलेक्सचे जुने नाते आहे. शेतकऱ्यांसाठी शेती उत्पादने बनवत आहोतच. त्याचबरोबर त्यांच्या मुलांच्या शिक्षणालाही हातभार लागावा, यासाठी शिष्यवृत्ती दिली जात आहे. या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणसाठी त्याची मदत होणार आहे. त्यातून चांगले आणि सक्षम अधिकारी तयार होतील. ग्रामीण भागातही शेतकरी आणि महिलांसाठी फाउंडेशनच्या माध्यमातून काम करत आहोत. महिलांचे सक्षमीकरणासाठी आणि त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी नेहमी काम सुरू राहील.’

या वेळी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी निलेश इंगोले आणि दीक्षा तेली यांनी शिष्यवृत्ती योजना सुरू केल्याबद्दल मुकुल माधव फाउंडेशनचे आभार व्यक्त केले. डॉ. प्रमोद पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. यशवंत साळे यांनी आभार मानले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZSSCH
Similar Posts
ट्रिनिटी अॅकॅडमीत साकारणार एक लाख वृक्षांची देवराई पुणे : ‘जागतिक तापमान वाढ आणि प्रदूषणाचा विळखा घट्ट होत असताना त्याला सामोरे जाण्यासाठी स्वच्छ, निरोगी वायू देणाऱ्या देशी वृक्षांची लागवड करणे खूप गरजेचे आहे. ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. या देशी वृक्षांपासून आपल्याला शुद्ध हवा, फुले आणि मधुर फळे मिळतात. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात वाढदिवस किंवा
एक लिटर पेट्रोलमध्ये १६० किलोमीटर; पुण्याच्या अथर्वने विकसित केली इलेक्ट्रिक-पेट्रोल हायब्रिड बाइक पुणे : एक लिटर पेट्रोलमध्ये तब्बल १६० किलोमीटर धावणारी बाइक! विश्वास बसत नाही ना; पण हे खरे आहे. अथर्व राजे या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने पेट्रोलची बचत करण्यासाठी जुन्या बाइकवर संशोधन करून ही अनोखी इलेक्ट्रिक पेट्रोल हायब्रिड बाइक विकसित केली आहे. त्यामुळे पेट्रोलच्या खर्चात बचत होईल, शिवाय ती पर्यावरणपूरकही असेल, असे त्याचे म्हणणे आहे
‘११ वी विज्ञाननंतरच्या शैक्षणिक संधी’ यावर व्याख्यान पुणे : ‘अकरावी विज्ञाननंतरच्या शैक्षणिक संधी’ या विषयावर ‘सीओइपिअन्स’तर्फे विवेक वेलणकर यांचे मोफत व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. गेली अनेक वर्षे ते करिअर निवडीबाबत मार्गदर्शन करत आहेत.
टाकाऊ घटकांपासून बनवलेल्या कपड्यांचा अनोखा फॅशन शो पुणे : ‘पुणे तेथे काय उणे’ ही उक्ती सार्थ करत, पुण्यामध्ये चक्क कचरा या संकल्पनेवर आधारित फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. मिस आणि मिसेस माय अर्थ नावाच्या या फॅशन शोमध्ये प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक पिशव्या, इलेक्ट्रॉनिक वेस्ट (खराब झालेले की-बोर्ड, माउस, सीडी, डीव्हीडी) आणि इतर टाकाऊ वस्तूंपासून बनविलेले ड्रेस सादर करण्यात आले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language